इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र,व्हीव्हीपॅटची सरमिसळ प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:09 AM2019-03-26T00:09:50+5:302019-03-26T00:10:22+5:30

नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि प्रथमच व्हीव्हीपॅट या यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्राची ईव्हीएम मॅनेजमेंट प्रणालीद्वारे प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रियेची माहिती राजकीय पक्षांच्या पक्ष प्रतिनिधींना देवून त्यांच्या समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

Electronic Voting Equipment, VVPAT System Process | इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र,व्हीव्हीपॅटची सरमिसळ प्रक्रिया

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र,व्हीव्हीपॅटची सरमिसळ प्रक्रिया

Next
ठळक मुद्देनिवडणूक विभाग सज्ज : प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रियेची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली माहिती

नांदेड : नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि प्रथमच व्हीव्हीपॅट या यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्राची ईव्हीएम मॅनेजमेंट प्रणालीद्वारे प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रियेची माहिती राजकीय पक्षांच्या पक्ष प्रतिनिधींना देवून त्यांच्या समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे प्रफुल्ल कर्णेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजानन पांपटवार यांची उपस्थिती होती. जिल्ह्यामध्ये एकूण ९ विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये ८३ -किनवट , ८४- हदगाव , ८५-भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दक्षिण , ८८- लोहा, ८९- नायगांव, ९०- देगलूर, ९१- मुखेड यांचा समावेश होतो. या मतदारसंघामध्ये एकूण २ हजार ९९१ मतदार केंद्रे असून यामध्ये किनवट - ३२४+५ (सहाय्यकारी मतदान केंद्रे), हदगाव-३१९+१ (सहाय्यकारी मतदान केंद्र), भोकर - ३२४+५ (सहाय्यकारी मतदान केंद्रे), नांदेड उत्तर- ३३६+१० (सहाय्यकारी मतदान केंद्रे), नांदेड दक्षिण-३०७+१७ (सहाय्यकारी मतदान केंद्रे), लोहा ३१२+३ (सहाय्यकारी मतदान केंद्रे), नायगाव-३४२ मतदान केंद्रे, देगलूर-३४६- मतदान केंद्रे, मुखेड-३४१ मतदान केंद्रे असे एकूण-२९९१ मतदान केंद्राचा समावेश आहे.

  • स्टॉंगरुममध्ये बॅलेट युनिट -६५५५, कंट्रोलींग युनिट-३६८९, व्हीव्हीपॅट-३९९१ उपलब्ध होते. त्यातून प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रियेने ८३ -किनवट मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयू) -४०५, कंट्रोलींग युनिट (सीयू) -४०५ आणि व्हीव्हीपॅट -४३८ व ८४- हदगांव मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बियू)-३९४, कंट्रोलींग युनिट (सीयू)-३९४, व्हीव्हीपॅट -४२६ तर ८५-भोकर मतदार संघाकरिता बॅलेट युनिट -४०५, कंट्रोलींग युनिट -४०५, व्हीव्हीपॅट -४३८, ८६- नांदेड उत्तरसाठी बॅलेट युनिट -४३०, कंट्रोलींग युनिट -४३०, व्हीव्हीपॅट -४६६ तर ८७-नांदेड दक्षिण बॅलेट युनिट -४०१, कंट्रोलींग युनिट -४०१, व्हीव्हीपॅट -४३५ तर ८८ -लोहा -बॅलेट युनिट -३८८, कंट्रोलींग युनिट -३८८, व्हीव्हीपॅट -४१९ तर ८९-नायगाव मतदार संघाकरिता बॅलेट युनिट -४२१, कंट्रोलींग युनिट -४२१, व्हीव्हीपॅट -४५५ तर ९०-देगलूर विधानसभा मतदारसंघाकरिता बॅलेट युनिट -426, कंट्रोलींग युनिट -४२६, व्हीव्हीपॅट-४६१ तर ९१-मुखेड विधानसभा मतदारसंघाकरिता बॅलेट युनिट -४२०, कंट्रोलींग युनिट -४२०, व्हीव्हीपॅट -४५४ यामध्ये ईव्हीएम मॅनेजमेंट प्रणालीद्वारे प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रिया केली आहे़

Web Title: Electronic Voting Equipment, VVPAT System Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.