शेतकरी संघटनांचे आज जिल्ह्यात एल्गार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:48 AM2020-12-04T04:48:38+5:302020-12-04T04:48:38+5:30

संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देते जिल्ह्यात सर्व समविचार शेतकरी संघटना, तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक संघटना बरोबर आल्या ...

Elgar agitation of farmers' organizations in the district today | शेतकरी संघटनांचे आज जिल्ह्यात एल्गार आंदोलन

शेतकरी संघटनांचे आज जिल्ह्यात एल्गार आंदोलन

googlenewsNext

संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देते जिल्ह्यात सर्व समविचार शेतकरी संघटना, तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक संघटना बरोबर आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात जोरदार रास्ता रोको, धरणे, निषेध करून शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघर्ष समिती व अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र कार्यध्यक्ष काॅ. अर्जुन आडे यांनी सांगितले. शेतकरीविरोधी तीन काळे कायदे वापस घ्या, शेतीमालाला रास्त आधारभाव द्या, शेतकरीविरोधी वीज बिल विधेयक रेटण्याचे बंद करा, या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जनतेने, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने शंकर सिडाम, जनार्दन काळे, किशोर पवार, प्रल्हाद चव्हाण, खंडेराव कानडे, प्रभाकर बोड्डेवार, स्टॅलीन आडे, प्रकाश वानखेडे, राहुल नाईक, राजकुमार पडलवार, अमोल आडे, मनोज सल्लावार आदींनी केले आहे.

Web Title: Elgar agitation of farmers' organizations in the district today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.