पोलीस वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:17 AM2021-04-02T04:17:45+5:302021-04-02T04:17:45+5:30

शिवजयंतीनिमित्त ध्वजवंदन किनवट - येथील शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौकात ध्वजवंदन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख ...

Empire of dirt in the police colony | पोलीस वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य

पोलीस वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य

googlenewsNext

शिवजयंतीनिमित्त ध्वजवंदन

किनवट - येथील शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौकात ध्वजवंदन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख सुरज सातूरवार, सतीश यलचलवार यांनी केले हाेते. तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे व माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी ध्वजवंदन केले. यावेळी मारोती सुंकलवार, शरद जयस्वाल, सुनील गरड, संतोष जाधव, शेख अफसर, कपिल रेड्डी आदी उपस्थित होते.

लोकावाड सेवानिवृत्त

धर्माबाद - आरोग्य विस्तार अधिकारी राजारेड्डभ लोकावार सेवानिवृत्त झाले. त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. १९८६ मध्ये ते कापसी ता.कंधार येथील प्रा.आ.केंद्रात सहाय्यक म्हणून रूजू झाले हाेते.

शॉर्टसर्कीटमुळे आग

लोहा - तालुक्यातील कापसी बु. शिवारात शॉर्टसर्कीटमुळे आग लागून हळद, ठीबक सिंचाचे पाईप जळून नुकसान झाले. ३१मार्च रोजी ही घटना घडली. यावेळी कनिष्ठ अभियंता गुरुप्रसाद देसाई, वरिष्ठ तंत्रज्ञ जे.ए.शेख, हुसेन शेख यांनी घटनास्थळी भेट देवून नुकसानीची पाहणी केली.

तिरमनवार यांना निरोप

किनवट - सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद तिरमनवार यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.आनंद भंडारे, मुख्याध्यापक नरसिंग नेमानीवार, सुनील पाठक, संजय चव्हाण, प्रा.जयवंत चव्हाण, विजय चिंतावार, प्रा.राजू राठोड आदी उपस्थित होते.

लसीकरणाला प्रारंभ

बिलोली - तालुक्यातील आदमपूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाला प्रारंभ झाला. अरविंद वाघमारे यांनी उद्घाटन केले. यावेळी डॉ.ज्याेती जाधव, आरोग्य सेविका ज्योती शिराळे, सोनाली चोंडे, अब्दुल खदीर, शिल्पा गायकवाड, कुसुम चिंतले, सविता शिनगारे, लक्ष्मीबाई उपलवार आदी उपस्थित होते.

दुचाकीची चोरी

मुखेड - उमरदरी ता.मुखेड येथील सुनील जाधव यांची दुचाकी चोरट्यांनी लांबविल्याची घटना २९मार्च रोजी रुबी हॉटेलसमोर घडली. या प्रकरणी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

पाण्याचे बील भरले

मांडवी - येथील ग्रामपंचायतने पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीजबिलापोटी ९७ हजारांचा धनादेश महावितरणकडे जमा केला. यावेळी जि.प सदस्य मधुकर राठोड, कनिष्ठ अभियंता एस.वाय. जाधव, सरपंच ईराबाई सिडाम, ग्रामविकास अधिकारी टी.एम. आडे आदी उपस्थित होते.

गुरांचा गोठा जळाला

किनवट - किनवट तालुक्यातील लालूनाईक तांडा येथे १ एप्रिल रोजी पहाटे शॉर्टसर्कीटमुळे गोठ्यास आग लागली. या आगीत गोठ्यातील शेळ्या, गाय यासह शेती उपयाेगी साहित्य जळून खाक झाले. रोशन राठोड यांच्या मालकीचा गोठा होता. घटनास्थळी तलाठी रेणके, बीट जमादार सत्यपाल मडावी, पशूवैद्यकीय अधिकारी ओमप्रकाश शिंदे यांनी भेट देवून पंचनामा केला.

ऑनलाईन वार्षिक सभा

कुंडलवाडी - येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ऑनलाईन वार्षिक सभा पार पडली. यावेळी चेेेेेेअरमन साईनाथ उत्तरवार, व्हाईस चेअरमन सयाराम नरावाड, संचालक लक्ष्मण होरके, हणमनलू गोनलेवार, संजय पाटील, रमेश भोरे, भूमन्ना ठक्कुरवाड, किशन लाड, शांताबाई मामीडवार, राम रत्नगीरे आदी उपस्थित होते.

निराधारांना कपड्यांचे वाटप

अर्धापूर - अर्धापूर शहरातील युवकांनी रासेयोच्या माध्यमातून अर्धापूर-नांदेड रोडलगत नई आबादी येथील गरजूंना जुन्या कपड्यांचे वाटप केले. यावेळी अमोल सरोदे, अरविंद सोनटक्के, रितेश कांबळे, निखील मोरे, विक्रम मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Empire of dirt in the police colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.