नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:38 AM2019-05-05T00:38:21+5:302019-05-05T00:39:22+5:30

नांदेड शहरात अकरावी-बारावीचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून नॅशनल इलिजीबिलीटी इन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा ५ मे रोजी होणार आहे़ या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती असल्यामुळे विद्यार्थी अचूक प्रश्न सोडविण्यावर अधिक भर देतात़

Enabled gang showing the bait to enhance the marks in the examination | नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविणारी टोळी सक्रिय

नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविणारी टोळी सक्रिय

Next
ठळक मुद्देबळी न पडण्याचे आवाहन काही पालकांशी साधला संपर्क

नांदेड : नांदेड शहरात अकरावी-बारावीचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून नॅशनल इलिजीबिलीटी इन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा ५ मे रोजी होणार आहे़ या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती असल्यामुळे विद्यार्थी अचूक प्रश्न सोडविण्यावर अधिक भर देतात़ परंतु, अनावधानाने प्रश्न चुकीचा सोडविला गेल्यास तो प्रश्न बरोबर करुन गुण वाढवून देतो असे आमिष दाखविणारी टोळी नांदेडात सक्रिय झाली आहे़ काही पालकांशीही त्यांनी संपर्क साधल्याची माहिती आली आहे़
नांदेड शहर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक हब म्हणून नावारुपास येत आहे़ राज्यभरातून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत़ नीट, जेईई यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांची संख्या नांदेडात लक्षणीय आहे़ त्यात देशभरात रविवार, ५ मे रोजी नीट परीक्षा होत आहे़
नीट परीक्षा देवून डॉक्टर होण्याचे अनेकांचे स्वप्न असते़ त्यासाठी विद्यार्थी आणि पालक दोघेही प्रयत्न करीत असतात़
नीट परीक्षेत अचूक प्रश्न सोडविण्यावर विद्यार्थ्यांचा अधिक भर असतो़ प्रश्न चुकीचा सोडविल्यास नकारात्मक गुणांकन पद्धती असल्यामुळे विद्यार्थी शक्यतो प्रश्न चुकीचा सोडविला जाणार नाही़, याची खबरदारी घेतात़ चुकीचा प्रश्न सोडविल्यास प्रत्येकी एक गुण कमी होतो़ त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो़
परंतु अनावधानाने विद्यार्थ्यांकडून असा प्रश्न चुकीचा सोडविला गेल्यास तर तो आम्ही बरोबर करुन देतो़ तसेच त्याचे गुणही वाढवून देतो असे आमिष काही मंडळी दाखवित आहेत़ त्याचबरोबर एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचेही सांगण्यात येत आहे़ त्यासाठी पालकांकडून पैसे उकळणारी टोळी सध्या सक्रिय झाली आहे़ या टोळीने काही पालकांशी संपर्क साधल्याची माहिती हाती आली आहे़ परंतु पोलीस ठाण्यात मात्र याबाबत अद्याप तरी पालकांनी तक्रार दाखल केली नाही़
त्यामुळे अशा टोळीपासून पालकांनी सावध राहण्याची गरज आहे़ अशा टोळीने संपर्क साधल्यास पोलिसांना त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
आमिषाला बळी पडू नका
एकदा सोडविलेला प्रश्न पुन्हा दुुरुस्त करण्याची कोणतीही मुभा नीट परीक्षेत नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोडविलेला प्रश्न सोडवितेवेळेसच अचूक सोडविण्याचा प्रयत्न करावा़ सोडविलेला प्रश्न दुरुस्त करुन देण्याचे कुणी आमिष दाखवित असल्यास त्याकडे विद्यार्थी व पालकांनी दुर्लक्ष करावे़ त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे, ओमएआर शीट, पैसे जमा करु नये असे आवाहन ब्रॉडवेचे संचालक गणेश तिडके यांनी केले़

Web Title: Enabled gang showing the bait to enhance the marks in the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.