नांदेड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:53 AM2019-01-18T00:53:20+5:302019-01-18T00:53:43+5:30
शहरातील विविध भागात महापालिकेने गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.या मोहिमेमुळे त्या-त्या भागातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
नांदेड: शहरातील विविध भागात महापालिकेने गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.या मोहिमेमुळे त्या-त्या भागातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून मोहिमेला सुरुवात केली. रेल्वेस्टेशन रोड ते शिवाजी पुतळा, चिखलीवाडी कॉर्नर ते महावीर चौक या भागात ही मोहीम राबविण्यात आली. रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे.
छोटे हातगाडे, पानटपºया, रस्त्यावरील विक्रेते यामुळे वाहतुकीला वारंवार अडथळा होत होता. हातगाडे व आॅटोचालकांचा वादही या भागात नित्याचीच बाब झाली होती. या वादानंतर काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरात आॅटो थांबे निश्चित करावे, अशी मागणी केली होेती.
शहरातील चिखलवाडी कॉर्नर, महावीर चौक या भागातही फूटपाथवरील दुकाने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा ठरत होते. हे अतिक्रमणही गुरुवारी हटविण्यात आले. आयुक्त लहुराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख रईस पाशा, स. आयुक्त अविनाश अटकोरे, गुलाम सादिक, सुधीर इंगोले आदींसह मनपाच्या पोलीस पथकाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.