नांदेड जि़प़च्या औषधी भांडार विभागाचे प्रवेशद्वार महिनाभरापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:26 AM2018-07-13T01:26:28+5:302018-07-13T01:27:23+5:30

वादळी वारे व पावसामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडार कक्षाच्या प्रवेश द्वारावरच पडलेले झाड महिनाभरानंतरही काढण्यात आले नाही़ प्रवेशद्वार बंदच असल्याने औषधी वाहतूूक करणारे वाहन मधेच अडकले आहे़ ऐन पावसाळ्यात औषधीची वाहतूक करणारे वाहन अडकून पडले आहे़ झाड उचलण्यासाठी जि़प़ बांधकाम विभागाने मनपाची परवानगी मागितली आहे़

The entrance of the Department of Junk Department has closed from month to month | नांदेड जि़प़च्या औषधी भांडार विभागाचे प्रवेशद्वार महिनाभरापासून बंद

नांदेड जि़प़च्या औषधी भांडार विभागाचे प्रवेशद्वार महिनाभरापासून बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : वादळी वारे व पावसामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडार कक्षाच्या प्रवेश द्वारावरच पडलेले झाड महिनाभरानंतरही काढण्यात आले नाही़ प्रवेशद्वार बंदच असल्याने औषधी वाहतूूक करणारे वाहन मधेच अडकले आहे़ ऐन पावसाळ्यात औषधीची वाहतूक करणारे वाहन अडकून पडले आहे़ झाड उचलण्यासाठी जि़प़ बांधकाम विभागाने मनपाची परवानगी मागितली आहे़
जिल्हा परिषद प्रांगणात असलेले हे झाड १६ जून रोजी वादळी वारे व पावसामुळे उन्मळुन पडले़ त्यानंतर हे झाड उचलन्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने महापालिकेकडे एक पत्र पाठवून सदर झाड पडल्याची माहिती कळवली़
महापालिकेने हे पत्र आल्यानंतरही कोणतीही कार्यवाही केली नाही़ परिणामी १६ जून पासून जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील हे झाड आरोग्य विभागाच्या भांडार कक्षाच्या प्रवेश द्वारावर तसेच पडून आहे़ विशेष म्हणजे या भांडार कक्षात एक औषधी वाहतूक करणारे वाहन मध्येच अडकले आहे़
झाड काढण्या ऐवजी जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाने महापालिकेकडे संपर्क साधत लातूरहून औषधी आणण्यासाठी महापालिकेचे वाहन ताब्यात घेवून लातूरहून औषधी आणल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़व्ही़आऱमेकाने यांनी सांगितले़
दुसरीकडे हे झाड प्रवेश द्वारावरुन काढण्याची तसदी जि़प़बांधकाम विभागाने घेतली नाही़ यापूर्वी जिल्हा परिषद प्रांगणातील काही झाडे विना परवानाच तोडण्यात आली होती़ त्या प्रकरणाची मोठी चर्चा झाली़ परिणामी पावसामुळे पडलेले झाड ही उचलण्याची तसदी बांधकाम विभागाने घेतली नाही़
जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या कार्यालयातील अंतर हाकेचे आहे़ या दोन कार्यालयातील विसंवादामुळे जवळपासच महिनाभर आरोग्य विभागासाठी महत्वाचा असलेला औषधी भांडार कक्षाचे प्रवेशद्वार बंद राहते ही बाब पावसाळ्यात तरी निश्चितपणे गंभीर आहे़
---
‘पडलेले झाड उचलण्यासाठी परवानगीची गरज नाही’
जिल्हा परिषद प्रांगणातील पडलेल्या झाडाबाबत पत्र मिळाल्याचे मनपा उद्यान अधीक्षक डॉ़मिर्झा बेग यांनी सांगितले़ सदर झाड वादळी वारे व पावसामुळे पडले आहे़ ते झाड तोडले नाही, परिणामी झाड उचलण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही़ याबाबत महापालिकेकडून जिल्हा परिषदेला कळविण्यात आले आहे़ जिल्हा परिषद हे झाड काढून घेवू शकते असे ही डॉ़बेग यांनी स्पष्ट केले़

Web Title: The entrance of the Department of Junk Department has closed from month to month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.