Video: जागतिक वन दिनीही किनवटचे जंगल पेटतेच; दुर्लक्षाने वनसंपदेचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:14 PM2022-03-21T12:14:27+5:302022-03-21T12:16:08+5:30
वनविकास महामंडळाकडे अपुरे कर्मचारी असल्याने ही आग विझवण्याकडे लक्ष देण्यात येत नाही.
नांदेड: नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या वनविकास महामंडळांच्या राखीव जंगलात गेल्या पाच सात दिवसापासून वणवा पेटला आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे हा वणवा वाढतच चालल्याने स्थानिकांत घबराहट पसरली आहे. आज जागतिक वन दिन असून वनसंपदेचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेत असलेल्या दिनीच मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या नुकसानीमुळे चिंता व्यक्त होत आहे.
वनविकास महामंडळाच्या जलधारा, शिवणी , अप्पाराव पेठ आदी गावांच्या शिवारातील जंगलात हा वणवा पेटला असून त्यात वनसंपदेचे प्रचंड नुकसान होत आहे.मात्र वनविकास महामंडळाकडे अपुरे कर्मचारी असल्याने ही आग विझवण्याकडे लक्ष देण्यात येत नाही. त्यामुळे झाडाझुडपांसह जंगलातील पशु पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.हा वणवा विझवण्यासाठी वन विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे .
जागतिक वन दिनीही किनवटचे जंगल पेटतेच#forestdaypic.twitter.com/KfXVguJgBV
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) March 21, 2022