दिवाळी आली तरी पाणीटंचाई सुरूच
By admin | Published: October 22, 2014 01:22 PM2014-10-22T13:22:05+5:302014-10-22T13:22:05+5:30
दिवाळी एका दिवसावर येवून ठेपली. लेकीबाळी माहेरी येण्यासाठी सुरुवात झाली. परंतु बरडशेवाळा या गावात पाण्यासाठी शिमगा सुरूच आहे.
Next
हदगाव : दिवाळी एका दिवसावर येवून ठेपली. लेकीबाळी माहेरी येण्यासाठी सुरुवात झाली. परंतु बरडशेवाळा या गावात पाण्यासाठी शिमगा सुरूच आहे.
निवडणुका होवू द्या, गडबड आहे, इलेक्शन ड्युटी आहे, असे म्हणून कर्मचार्यांनी वेळ मारून नेली. परंतु दोन दिवसांपासून गावात सर्व समाजाच्या नवीन लग्न झालेल्या व काही वर्षापूर्वी लग्न झालेल्या लेकी-बाळी, नातवंड मामाच्या गावाला येवू लागली आहेत. शाळांना सुट्या लागल्या. मामाच्या गावी जावून धम्माल करू म्हणणार्या या बरडशेवाळाच्या भाच्यांवर व लेकीबाळींवर दिवाळीची आंघोळ कशी घालणार असे बोलले जात आहे.
त्याचप्रमाणे येथील मामा-मामी, आजीबाई पाण्याच्या संकटाने त्रस्त झाल्या आहेत. बरडशेवाळा हे गाव नांदेड-नागपूर या महामार्गावर आहे. त्यामुळे आबादीच्या नागरिकांना हा महामार्ग ओलांडून १ कि.मी. अंतरावर असलेल्या दत्त मंदिरातून पाणी भरत आहेत. येथे फक्त पिण्याचेच पाणी मिळते. परंतु हा महामार्ग ओलांडताना लहान मुले, वृद्ध यांच्या जिवाला धोका आहे. ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी भटकंती करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया येथील महिलांनी दिल्या. /(वार्ताहर)