पोहता येत नसतानाही गोदापात्रात उतरने जीवावर बेतले; विष्णूपुरीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 17:06 IST2022-03-19T17:06:22+5:302022-03-19T17:06:59+5:30
धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही परिवारावर शोककळा पसरली आहे.

पोहता येत नसतानाही गोदापात्रात उतरने जीवावर बेतले; विष्णूपुरीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू
नांदेड: पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूण मित्रांचा काळेश्वर मंदिराच्या मागील गोदावरी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जय रूपेश पुजारी (१९), व त्याचा मित्र गजानन राजू हाटकर (२८) असे मृत मुलांचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या विजय नगरातील रहिवासी जय रूपेश पुजारी (वय- १९ वर्षे), व त्याचा मित्र गजानन राजू हाटकर (वय-२८, रा. दत्त नगर, नांदेड) हे दोघे शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी विष्णूपुरी शिवारातील काळेश्वर मंदिर परिसरात गेले. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही गोदावरी पात्रात बुडून अंत झाला, अशी माहिती ठाणे अंमलदार तथा सहाय्यक पोउपनि. ज्ञानोबा गिते व मदतनीस महिला पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली आहे.
धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या दुख:द घटनेमुळे पुजारी आणि हाटकर यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. प्र. पो.नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संजय रामदिनेवार हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.