ईव्हीएम फेरफार प्रकरण: मासे घेण्याच्या बहाण्याने ‘त्याने’ चोरले सीमकार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:12 AM2017-11-16T02:12:37+5:302017-11-16T02:14:18+5:30
पंधरा लाखांत निवडणूक मतदान यंत्रात फेरफार करण्याचा दावा करणा-या सचिन राठोड याने शिवणीच्या बाजारात मासे घेण्याच्या बहाण्याने मच्छीमाराचे सीमकार्ड चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
इस्लापूर (जि़ नांदेड) : पंधरा लाखांत निवडणूक मतदान यंत्रात फेरफार करण्याचा दावा करणा-या सचिन राठोड याने शिवणीच्या बाजारात मासे घेण्याच्या बहाण्याने मच्छीमाराचे सीमकार्ड चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
१५ लाख रुपये द्या, ईव्हीएममध्ये फेरफार करून देतो, असे सांगून हिमाचल प्रदेशातील आमदारांना निवडणूक आयोगाच्या नावाने त्याने एसएमएस पाठवल्याचे उघड झाले. त्यानंतर नांदेड पोलिसांनी मंगळवारी त्याला बेड्या ठोकल्या़ १ आॅक्टोबरला शिवणीच्या बाजारात मासे घेण्याच्या बहाण्याने त्याने रामराव झिंगरे यांना गाठले होते.
आरोपी सचिन मूळचा दयाल धानोरा (ता़ किनवट) येथील रहिवासी आहे़ तो नांदेडमधील सुंदरनगर येथे वास्तव्यास होता़ सीमकार्ड चोरी प्रकरणी त्याला इस्लापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ त्याची सखोल चौकशी सुरू आहे़ किनवट न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.