जिल्ह्यात २४ महसूल मंडळांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:44+5:302021-07-23T04:12:44+5:30
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. बिलोली तालुक्यातील आदमपूर मंडळात ६५ मि.मी., लोहा तालुक्यातील ...
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. बिलोली तालुक्यातील आदमपूर मंडळात ६५ मि.मी., लोहा तालुक्यातील माळाकोळी मंडळात ७२.५०, सोनखेड ६८, हदगाव तालुक्यातील हदगाव मंडळात ८०.७५, तामसा ६५.७५, आष्टी १२४, भोकर तालुक्यातील भोकर येथे ६७.७५, मोघाळी ७२.५०, मातूळ ८१.२५, किनी ११०.५०, किनवट तालुक्यातील किनवट मंडळात १०४.२५, बोधडी १४९.५०, इस्लापूर १७५.७५, जलधारा २०७.५०, शिवणी १७४, मांडवा ९०, दहेली ९२.५०, हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर मंडळात ११९.५० मि.मी., जवळगाव १३३, सरसम १२८ आणि माहूर तालुक्यातील माहूर मंडळात ७०, वानोळा ६९.२५, वाई ६८.५० आणि सिंदखेड महसूृल मंडळांत ६९ मि.मी. पाऊस गेल्या २४ तासांत नोंदविण्यात आला आहे. २०७.५० पावसाची नोंद जलधारा महसूल मंडळात झाली आहे. एका दिवशी हा सर्वाधिक पाऊस नोंदवला आहे. किनवट तालुक्यातील ७ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात जुलैमध्ये १९१.२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. अपेक्षेपेक्षा जिल्ह्यात जास्त पाऊस झाला असून, ३३१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.