नांदेड जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:14+5:302021-07-13T04:06:14+5:30
शहर व जिल्ह्यात रविवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली सायंकाळी या पावसाचा जोर वाढला. रात्री उशिरापर्यंत संततधार पाऊस सुरू होता. ...
शहर व जिल्ह्यात रविवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली सायंकाळी या पावसाचा जोर वाढला. रात्री उशिरापर्यंत संततधार पाऊस सुरू होता. जिल्ह्यात ५६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये नांदेड तालुक्यातील सर्वच आठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बिलोली तालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी झाली. मुखेड तालुक्यातील जांब या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. लोहा तालुक्यात पाचपैकी सहा मंडळात तर देगलूरमध्ये खानापूर या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मुदखेड तालुक्यातील तीनही मंडळात अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे. धर्माबाद तालुक्यातील तीन उमरी एक आणि अर्धापूर तालुक्यात दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसाने बळीराजा सुखावला आहे. गेल्या दोन आठवड्यात पावसाने ताण दिल्याने बळीराजा चिंतीत झाला होता. परंतु दहा जुलैनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर खरीप पिकेही बहरली आहेत.