नांदेड जिल्ह्यातील 4 तालुक्यात अतिवृष्टी; शेतीचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 12:21 PM2020-08-17T12:21:13+5:302020-08-17T12:22:36+5:30

. रविवारी किनवटसह  माहूर, हदगाव आणि  भोकर तालुक्यात  पावसाचा जोर वाढला.

Excessive rainfall in 4 talukas of Nanded district; Excessive damage to agriculture | नांदेड जिल्ह्यातील 4 तालुक्यात अतिवृष्टी; शेतीचे अतोनात नुकसान

नांदेड जिल्ह्यातील 4 तालुक्यात अतिवृष्टी; शेतीचे अतोनात नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देयात सर्वाधिक किनवट तालुक्यातील 6 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आता चिंतित झाला आहे.

नांदेड : जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने किनवट, माहूर, हदगाव आणि  भोकर  तालुक्यात अतिवृष्टीची नोंद  झाली आहे. यात सर्वाधिक किनवट तालुक्यातील 6 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.

जिल्ह्यात  5 दिवसांपासून  पावसाची  संततधार सुरुच आहे. रिमझीम पावसाने  सूर्यदर्शनही नाही. रविवारी किनवटसह  माहूर, हदगाव आणि  भोकर तालुक्यात  पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळी  8 वाजता  झालेल्या  एकूण  नोंदित किनवट तालुक्यात बोधडी 65.50 मिमी, इस्लापुर 65.50, जलधारा 65.50, शिवणी 72, मांडवा 65.50 मिमी  आणि दहेली मंडळात 65.50 मिमी  पावसाची नोंद झाली.

भोकर तालुक्यातील मातूळ मंडळात 65.50 मिमी, हदगाव तालुक्यातील मनाठा मंडळात 67 मिमी आणि माहूर तालुक्यात सिंदखेड मंडळात 65.50 मिमी  पावसाची नोंद  झाली. जिल्ह्यात सरासरी 25.09 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान होत आहे. मूग, उडिदाच्या शेंगाना पावसाने मोड फूटत आहेत. तसेच सोयाबीनची पानेही पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकरी आता चिंतित झाला आहे.

Web Title: Excessive rainfall in 4 talukas of Nanded district; Excessive damage to agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.