नांदेड जिल्हयातील मुखेड, बाहाळी मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 11:06 AM2020-07-09T11:06:59+5:302020-07-09T11:08:10+5:30
जिल्ह्यात आजवर २६५.४४ मि.मी एकूण सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड: बुधवारी नांदेड शहरास जिल्ह्याच्या ग्रामिण भागात दमदार पाऊस झाला. मुखेड तालुक्यातील मुखेड मंडळासह बाऱ्हाळी येथेही अतिवृष्टी झाली आहे. मुखेड येथे ६७ मि.मी. तर बाऱ्हाळी येथे ६८ मि.मी. पाऊस झाला आहे.
गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्हयात सरासरी १६.५९ पाऊस झाला असून सर्वाधिक सरासरी ४९ मि.मी पावसाची नोंद मुखेड तालुक्यात झाली आहे. मुदखेड ३८.६७, नांदेड १५.१३, देगलूर ३०.८३, लोहा, ३५, कंधार १४.६७, उमरी १२, भोकर २८.२५, तर अर्धापूर तालुक्यात १४.३३ मि.मी सरासरी पाऊस झाला. धर्माबाद, नायगाव, हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर किनवट, माहुरसह हिमायतनगर तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते.
जिल्ह्यात आजवर २६५.४४ मि.मी एकूण सरासरी पावसाची नोंद झाली असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो २६.५७ टक्के इतका आहे. आजवर सर्वाधिक ४९.१९ टक्के पाऊस हिमायतनगर तालुक्यात तर सर्वात कमी १९.०४ मि.मी पाऊस कंधार तालुक्यात झाला आहे.