नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:28 AM2018-06-01T00:28:17+5:302018-06-01T00:28:17+5:30

जिल्ह्यात २०१८ च्या खरीप हंगामात पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे़ त्याच वेळी कपाशीच्या पे-यात मात्र अल्प प्रमाणात घट होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे़ गतवर्षी बोंडअळीच्या हल्ल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते़ त्यामुळे ही घट अपेक्षित आहे़

Expectation of Kharif season sowing area in Nanded district | नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा

Next
ठळक मुद्देबोंडअळीचा हल्ला : कपाशीच्या पेऱ्यात यंदा घट होण्याचा कृषी विभागाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात २०१८ च्या खरीप हंगामात पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे़ त्याच वेळी कपाशीच्या पे-यात मात्र अल्प प्रमाणात घट होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे़ गतवर्षी बोंडअळीच्या हल्ल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते़ त्यामुळे ही घट अपेक्षित आहे़
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र हे १० लाख ३३ हजार १०० हेक्टर आहे़ त्यात गतवर्षी खरीप हंगामात ७ लाख ७६ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती़ तर रबी हंगामातही १ लाख ६८ हजार १२७ हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती़ गतवर्षी झालेल्या खरीप हंगामाच्या लागवडीत सर्वाधिक लागवड नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया सोयाबीन पीकाची झाली होती़ जिल्हयात ३ लाख १७ हजार ९५७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली होती़ यंदाही सोयाबीनच्या पेºयाचे प्रमाण तितकेच राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे़ खरीप ज्वारीच्या लागवडीतही यंदा मोठी वाढ अपेक्षित धरली आहे़ गतवर्षी ६१ हजार ४९८ क्षेत्रात ज्वारीची लागवड झाली होती़ यंदा ती १ लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रात ज्वारीची पेरणी होईल अशी अपेक्षा आहे़ तुरीच्या पेºयातही गतवर्षीच्या प्रमाणात थोडी घट अंदाजित धरली आहे़
गतवर्षी जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाची लागवड झाली होती़ यंदा त्यात घट होईल असा अंदाज कृषी विभागाने केला आहे़ २ लाख ५० हेक्टर क्षेत्रात कापूस लागवडीची तयारी होत असल्याचा अंदाज वर्तविला आहे़
जिल्ह्यात कापूस पिकाचे सर्वसाधरण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टर इतके आहे़ यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे संभाव्य कापूस लागवडीसाठी वापरात येईल अशी अपेक्षा आहे़ या पेरणीसाठी आवश्यक बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख ५३ हजार इतकी आहे़ त्यामध्ये बीटी कापूस बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख २८ हजार इतकी आहे़ त्यामध्ये बीजी-२ बियाणे हे १२ लाख १८ हजार तर बीजी-१ बियाणे हे १० हजार अपेक्षित आहे़ नॉन बीटी बियाणांच्या पाकिटांची संख्या ही २५ हजार अपेक्षित आहे़
२०१७-१८ मध्ये ७६ हजार ९९५ मे़टन खत शिल्लक आहे़ त्याच वेळी खरिपासाठी १३ हजार ५६० मे़टन उपलब्ध झाले आहे़ त्यातील ३ हजार ५७२ मे़टन खताची विक्री आतापर्यंत झाली असून ८६ हजार ९८३ मे़टन खत अद्यापही शिल्लक आहे़ यामध्ये युरीया, डी.ए़पी़, एम़ओ़पी़, एऩपीक़े़, एस़एस़पी़, ए़एस़, एस़ओ़पी़ खत प्रकारांचा सामवेश आहे़
जिल्ह्यात अनुदानीत रासायनीक खतांची विक्रीही डी.बी़टी़ अर्थात थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाअंतर्गत होत आहे़ शेतकºयांना एम़आऱपी़ दरानेच खताची विक्री करणे बंधनकारक आहे़ शेतकºयांना खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे़ रासायनिक खतांच्या विक्रीवरील अनुदान संबंधित उत्पादक आणि पुरवठाधारकांना अदा केले जात आहे़ नांदेड जिल्ह्यासाठी व्हिजन टेक या कंपनीकडून ८४५ आणि अ‍ॅनॉलॉजिक्स कंपनीकडून १५९ असे १००४ पीओएस मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत़
जिल्ह्यात बोगस बियाणे, खते विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर १ आणि तालुकास्तरावर १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ बियाणांच्या निवडीसंदर्भात शेतकºयांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे़ कृषी विभागाने ग्रामस्तरावर बैठका घेण्यात येणार आहे़ शेतकºयांनी सोयाबीन बियाणे घरचे वापरणे, बीज प्रक्रिया करणे, उगवण क्षमतेनुसार सोयाबीन बियाणांचा वापर करणे आवश्यक आहे़ बीटी कापूस बियाणा बाबत एकाच वाणाचा आग्रह न धरता इतर समतुल्य वाणाची निवड करावी अशी सूचना कृषी विभागाने केली आहे़
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे़ ज्वारी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन आदी पिकांसाठी महाबीजचे ५४ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे़ खाजगी बियाणांचे प्रमाण २३ हजार ९१० क्विंटल इतके आहे़
---
कापसाचे क्षेत्र : ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टर
जिल्ह्यात कापूस पिकाचे सर्वसाधरण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टर इतके आहे़ यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे संभाव्य कापूस लागवडीसाठी वापरात येईल अशी अपेक्षा आहे़ या पेरणीसाठी आवश्यक बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख ५३ हजार इतकी आहे़
गतवर्षी जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाची लागवड झाली होती़ यंदा त्यात घट होईल असा अंदाज कृषी विभागाने केला.
शेतकºयांना खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे़ रासायनिक खतांच्या विक्रीवरील अनुदान संबंधित उत्पादक आणि पुरवठाधारकांना अदा केले जात आहे़
---
भौगोलिक क्षेत्र १० लाख ३३ हजार १०० हेक्टर
बीटी कापूस बियाणाबाबत एकाच वाणाचा आग्रह न धरता इतर समतुल्य वाणाची निवड करावी अशी सूचना कृषी विभागाने केली आहे़ शेतकºयांनी खते, बियाणे आदी बाबत अडचणी अथवा तक्रारी असल्यास किसान संचार टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३४००० तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक ०२४६२-२३०१२३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा़
जिल्ह्यात कापूस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टर इतके आहे़ यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे संभाव्य कापूस लागवडीसाठी वापरात येईल अशी अपेक्षा आहे़ या पेरणीसाठी आवश्यक बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख ५३ हजार इतकी आहे़

Web Title: Expectation of Kharif season sowing area in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.