नांदेड जि़ प क़र्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:23 AM2019-05-28T00:23:47+5:302019-05-28T00:26:01+5:30

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या संदर्भात शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप कोणतेच नियोजन झाले नाही़ त्यामुळे पाच हजार कर्मचा-यांच्या बदल्या मुदतीत पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे़

Extending the transfers of Nanded zp employee | नांदेड जि़ प क़र्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ

नांदेड जि़ प क़र्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाची कासवगती जिल्हा परिषदेतील वर्ग ३, वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ७ जूनपर्यंत पूर्ण होणार का ?

भारत दाढेल।
नांदेड : जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या संदर्भात शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप कोणतेच नियोजन झाले नाही़ त्यामुळे पाच हजार कर्मचा-यांच्या बदल्या मुदतीत पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे़
जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांसंदर्भात शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे़ ज्यामध्ये १२ एप्रिल या तारखेपासून ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यासाठी निश्चित केलेले आहे़ त्यानंतर वेगवेगळ्या कार्यवाहीचे तारीखवार टप्पेदेखील निश्चित केले आहेत़ यामध्ये १६ ते २५ मे या कालावधीत समुपदेशनाने प्रत्यक्ष बदलीची कार्यवाही पार पाडावयाची होती़ दरम्यानच्या काळात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकेची आचारसंहिता लागू होती़ निवडणूक आचारसंहितेच्या काळात बदल्यांची कार्यवाही करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरत असल्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांची बदली प्रक्रिया राबविता आली नाही़ त्यामुळे या बदल्यांना ७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़
दरम्यान, जिल्हा परिषदेतील एकुण १३ हजार कर्मचाºयांपैकी ८ हजार ५०० शिक्षक संवर्गात येतात़ शिक्षक संवर्गातील बदल्या वगळून उर्वरित वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असल्यामुळे पुढील दहा दिवसात कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेला या बदल्या कराव्या लागणार आहेत़ २ हजारांवर परिचारिक, ४५९ कनिष्ठ लिपीक, १४३ वरिष्ठ लिपीक, २४ कक्ष अधिकारी, १ हजार ८६ शिपाई, ७९ शिपाई आदी कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत़
शिपाई पदाच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने घेणे आवश्यक आहेत़ परंतु मागील २ वर्षांपासून या बदल्या रखडल्या आहेत़ समुपदेशन पद्धतीने बदल्या न करता काही पदाधिका-यांच्या मर्जीनुसार गतवर्षी ५० शिपायांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या़ त्यामुळे उर्वरित शिपायांवर अन्याय झाल्याची भावना वाढली होती़ जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचा-यांना एकाच विभागात पाच वर्षे काम करता येत नाही़ मात्र जिल्हा परिषद मुख्यालयात अनेक वर्षापासून एकाच विभागात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत़ त्यांच्या बदल्यासुद्धा शासन नियमानुसार होणे गरजेचे आहे़ परंतु असे होत नाही़ या बदल्यांच्या संदर्भात अनेकदा पाठपुरावा केला़ मात्र प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही़
यावर्षी वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचा-यांच्या बदल्या न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जि़ पक़र्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांनी दिला आहे़
परिचर, वाहनचालकांच्या बदल्या रखडल्या

  • परिचर, वाहनचालक यांच्या बदल्याही गत पाच वर्षांपासून झाल्या नाहीत़ वाहनचालकांच्या बदल्या या विनंतीनुसार करण्यात येतात़ मात्र जिल्हा पदिषदेने या बदल्यांची प्रक्रिया राबवलीच नाही़ त्यामुळे अनेक वर्षांपासून किनवट, माहूर सारख्या ठिकाणी वाहनचालक आपली सेवा बजावत आहेत़ या वाहनचालकांनी वेळा बदलीसाठी विनंती केली़ मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले़
  • शासनाने बदली प्रकियेसाठी ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे़ आजच हे पत्र मिळाले आहे़ पुढील दोन, तीन दिवसांत बदल्यांच्या संदर्भात नियोजन केले जाईल असे सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी सांगितले़
  • ग्रामसेवकांची संख्या १ हजारांवर असून १३८ ग्रामविकास अधिकारी आहेत़ इतर जिल्ह्यात बदलीची पूर्वतयारी झाली आहे़ नांदेड जिल्हा परिषदेने मात्र अद्याप पात्रता यादीच तयार केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले़
  • शिपाईपदाच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने घेणे आवश्यक आहेत़ परंतु २ वर्षांपासून या बदल्या रखडल्या आहेत़ काही पदाधिकाºयांच्या मर्जीनुसार गतवर्षी ५० शिपायांच्या अंतर्गत बदल्या केल्या़ त्यामुळे उर्वरित शिपायांवर अन्याय झाल्याची भावना वाढली होती़
  • मागील काही वर्षांपासून बदल्यांचा घोळ सुरू आहे़ यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या उपस्थितीत बदल्या झाल्या तरच त्या पारदर्शी होतील, असे ग्रामसेवक संघटनेचे मधुकर मोंगल यांनी सांगितले़

Web Title: Extending the transfers of Nanded zp employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.