महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:02+5:302021-05-06T04:19:02+5:30

रास्तभाव धान्य दुकानात तीन महिन्यांची साखर उपलब्ध नांदेड : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकासाठी शासनाने एप्रिल, मे ...

Extension of Mahavas Abhiyan till 5th June | महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ

महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ

googlenewsNext

रास्तभाव धान्य दुकानात तीन महिन्यांची साखर उपलब्ध

नांदेड : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकासाठी शासनाने एप्रिल, मे व जून, २०२१ साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी २ हजार ३४ क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करून प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय नियतन (क्विंटलमध्ये) पुढीलप्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड- १२२, अर्धापूर- २४.५, मुदखेड- ३४.५, कंधार- ९४, लोहा- १३२.५, भोकर- ८६, उमरी- ६०.५, देगलूर- १२३.५, बिलोली- १२२, नायगाव- ९१, धर्माबाद- ७०, मुखेड- १२६, किनवट- ४४०.५, माहूर- २०२.५, हदगाव- २०८, हिमायतनगर-९६.५ याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Web Title: Extension of Mahavas Abhiyan till 5th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.