प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:52+5:302021-01-08T04:53:52+5:30
नांदेड विभागातून धावणारी गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पनवेल ३१ मार्चपर्यंत धावेल. तसेच गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते ...
नांदेड विभागातून धावणारी गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पनवेल ३१ मार्चपर्यंत धावेल. तसेच गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड १ एप्रिलपर्यंत, गाडी संख्या ०७०४९ हैदराबाद ते औरंगाबाद ३१ मार्चपर्यंत, गाडी संख्या ०७०५० औरंगाबाद ते हैदराबाद १ एप्रिलपर्यंत, ०२७६५ (आठवड्यातून दोन वेळा) तिरुपती ते अमरावती मंगळवार आणि शनिवार ३० मार्चपर्यंत धावेल.
गाडी संख्या ०२७६६ (आठवड्यातून दोन वेळा)अमरावती ते तिरुपती गुरुवार आणि सोमवार १ एप्रिलपर्यंत, ०२७२० (आठवड्यातून दोन वेळा)हैदराबाद ते जयपूर सोमवार आणि बुधवार ३१ मार्चपर्यंत धावेल. तसेच ०२७१९ (आठवड्यातून दोन वेळा)जयपूर ते हैदराबाद बुधवार आणि शुक्रवार २ एप्रिलपर्यंत, ०७६१० (साप्ताहिक) पूर्णा ते पटना गुरुवार २५ मार्चपर्यंत, ०७६०९ (साप्ताहिक) पटना ते पूर्णा शनिवारी धावेल, या गाडीला २७ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करताना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल. सदर गाड्यांचे वेळापत्रक रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.