नीट, जेईईमुळे बारावीच्या निकालात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:54 AM2019-05-30T00:54:08+5:302019-05-30T00:57:58+5:30
विद्यार्थ्यांनी नीट, जेईईच्या परीक्षेचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने यंदा बारावीच्या निकालात घट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले होते़ गतवर्षीच्या तुलनेत ३़ ४ टक्यांनी निकाल कमी लागला आहे़
नांदेड : विद्यार्थ्यांनी नीट, जेईईच्या परीक्षेचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने यंदा बारावीच्या निकालात घट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले होते़ गतवर्षीच्या तुलनेत ३़ ४ टक्यांनी निकाल कमी लागला आहे़
बारावीच्या निकालाची घसरण कमी झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे़ मागील काही वर्षात निकालाचा आलेख उंचावला होता़ मात्र तो आता खाली आल्याचे दिसून येत आहे़ यामागे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा असल्याचे दिसून येते़ विज्ञान शाखेचे विद्यार्थी पीसीबी अथवा पीसीएम या दोन्हीची ग्रुपींग होईल एवढेच ध्येय समोर ठेवून अभ्यास करतात़ या विद्यार्थ्यांची एनईईटी व जेईई मेन अॅडव्हॉन्स तयारीकडे अधिक लक्ष असते़ एकीकडे ग्रुपींग करण्यासाठी बोर्डाची तयारी करणे तर दुसरीकडे वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमावर अधिक भर देणे, हा प्रकार सुरू झाला असल्याचे विद्यार्थी समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांनी सांगितले़
नांदेड जिल्हा दुस-या क्रमांकावर
जिल्ह्याचा निकाल यंदा ८६़२० टक्के लागला असून ८२़६३ टक्के मुलांनी तर ९०़८६ टक्के मुलींनी बाजी मारली आहे़ जिल्ह्यातून ३६ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३६ हजार ४४ जणांनी परीक्षा दिली होती़ त्यामध्ये ३१ हजार ७० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे़ २०१६ मध्ये ८४़९९ टक्के, २०१७ मध्ये ८८़५४ टक्के, २०१८ मध्ये ८९़३४ टक्के निकाल लागला होता़ यावर्षी मात्र ८६़२० टक्क्यावरच समाधान मानावे लागले़ निकालाचा हा आलेख गत दोन वर्षापेक्षा खाली आला आहे़ लातूर विभागात नांदेड, लातूर, उस्मानाबाद हे जिल्हे येतात़ मागील तीन वर्षाची दुस-या क्रमांकाची परंपार यावर्षी सुद्धा नांदेड जिल्हा विभागाने राखली़ यंदा शंभर टक्के निकाल लागणा-या महाविद्यालयांची संख्याही कमी झाली आहे़ जिल्ह्यातील २५ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे़ मात्र अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या ही नगण्य आहे़ त्यामुळे शंभर टक्के निकालाचे यश म्हणावे तेवढे समाधान देणारे नाही़ नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल नीट व जेईईकडे वाढल्याने विद्यार्थी बारावीचा अभ्यास गांभिर्याने करताना दिसत नाहीत़ अनेक विद्यार्थी नावालाच महाविद्यालयात प्रवेश घेतात़ काही महाविद्यालयात तासिका होत नाहीत़ केवळ प्रात्यक्षिक परीक्षा व नंतर मुख्य परीेक्षेची तयारी करून घेतात़ नीट परीक्षेसाठी वेळ राखून बारावीचा अभ्यास केला जात असल्यानेच निकालात घट झाली आहे़