कौटुंबिक वादाचा वाईट शेवट; भाऊजीने मेहुण्याच्या गळ्यात स्क्रू-ड्रायव्हर खुपसून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 04:32 PM2024-11-15T16:32:22+5:302024-11-15T16:33:09+5:30

बहीण आणि भाऊजीमधील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघा भावांवर भाऊजीने केला हल्ला

Family dispute ends badly in Nanded: wife's brother was killed by husband by screw-driver attack in neck | कौटुंबिक वादाचा वाईट शेवट; भाऊजीने मेहुण्याच्या गळ्यात स्क्रू-ड्रायव्हर खुपसून केला खून

कौटुंबिक वादाचा वाईट शेवट; भाऊजीने मेहुण्याच्या गळ्यात स्क्रू-ड्रायव्हर खुपसून केला खून

नांदेड: कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय मेहुण्याचा भाऊजीने स्क्रू ड्रायव्हर गळ्यात खूपसून निर्घृण खून केला. ही हृदयद्रावक घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ईदगाह मैदान परिसरात १४ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजेदरम्यान घडली.  

 शहरातील ईदगाह मैदान परिसरातील सय्यद हुसेन सय्यद मंजुर आणि त्यांचा भाऊ सय्यद माजीद यांनी बहिण सुल्ताना आणि तिचा पती अमेर खान यांच्यातील वाद मिटविण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली होती. मात्र, वादाच्या ठिणगीने भयंकर रूप घेतले. अमेर खानने आधी वाद घालत मेहुण्यांना रागाने झटापट केली. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हर आणि भाजी कापण्याचा चाकू घेऊन बाहेर येत अमेर याने माजीद यांच्या गळ्यावर जोराने वार केला. जखमी अवस्थेत माजीद यांना तातडीने विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

या प्रकरणाची माहिती समजताच पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर तसेच त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. मृताचे लहान बंधू सय्यद हुसेन सय्यद मंजुर (रा. आयेशाबाग, ईदगाह मैदान परिसर, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अमेरखान गौसखान याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पो. नि. सचिन गढवे व त्यांचे अन्य सहकारी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, आरोपी अमेर खानला नांदेड ग्रामीण पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

Web Title: Family dispute ends badly in Nanded: wife's brother was killed by husband by screw-driver attack in neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.