सोनकांबळे यांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:40+5:302021-07-07T04:22:40+5:30
मुख्याध्यापकपदी बेंबरेकर धर्माबाद - येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी सन्मुख बेंबरेकर तर उपमुख्याध्यापकपदी रामेश्वर गायकवाड यांना पदाेन्नती देण्यात आली. ...
मुख्याध्यापकपदी बेंबरेकर
धर्माबाद - येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी सन्मुख बेंबरेकर तर उपमुख्याध्यापकपदी रामेश्वर गायकवाड यांना पदाेन्नती देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर, सचिव ॲड. विश्वनाथराव पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले.
सेवानिवृत्तीबद्दल निरोप
लोहा - उमरातांडा ता. लोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक कपाळे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा फटाले, केंद्रप्रमुख टी.पी. पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, मुख्याध्यापक बी. जी. कापसे, आर. जी. वाकोरे, आर. डी. सय्यद यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गणपत चव्हाण, प्रास्ताविक वाकोरे तर अशोक कपाळे यांनी आभार मानले.
वसंतराव नाईक जयंती
किनवट - माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंती शिवणी येथे साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मीबाई डुडुळे तर उद्घाटक म्हणून जि.प. सदस्य सूर्यकांत आरंडकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी आलेवार, अर्जुन आडे, शिवराम जाधव, सरपंच सुनील आडे, डॉ. दत्ता राठोड, गजानन बच्चेवार, दत्ता भेरे, लिंबाजी धारावर, सरपंच सुधाकर जाधव, रोशनखाँ पठाण, किसन वानोळे, यादव आमले यांची उपस्थिती होती.
ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
हदगाव - बरडशेवाळा प्रा.आ. केंद्रातील आरोग्य सहायक फटिंग व आरोग्य सेविका हटकर यांना पदोन्नती झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तलाठी बी.यू. इप्पर, मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक पावडे, ज्ञानेश्वर मस्के, दत्तात्रय मस्के, उपसरपंच भाऊराव सूर्यंवशी, ग्रा.पं. सदस्य महिपती पहाडे, रुस्तुम कुमकर, राजू नाईक, आनंदराव मस्के, प्रकाश हारण, अनिल जमदाडे, गंगाधर जमदाडे उपस्थित होते.
नामफलकाचे अनावरण
हदगाव - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नामफलकाचे अनावरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे आयोजन व्यंकटेश पाटील तालंगकर यांनी केले. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच आनंद कल्याणकर, शंकरराव जोगदंड, मंगेश कदम, संजय कदम, संदेश पाईकराव, यशवंत खिराडे, भीमराव गाढे, स्वप्निल निर्मल, शिवराज पचलिंगे आदी उपस्थित होते.
मिलिंद शाळेत वृक्षारोपण
कुंडलवाडी - एसबीआयच्या वर्धापन दिनानिमित्त मिलिंद प्रा. शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बँक व्यवस्थापक मंगेश सोनुले, राहुल कांबळे, कृष्णा सवालोलू, अरुण म्हसेवाड, कविता रामसागरकर, मुख्याध्यापक एस.एम. कांबळे, सुभाष दरबस्तवार, शिवराज हाळीखेडे, आर.डी. नरावाड, कुलदीप खेळगे, डी.एस. पांचाळ, एन.एल.लाड, एस.टी. तुरे, जी.एस. गडपवार, गंगाधर तांदूलवाड, लक्ष्मण येपुरवाड आदी उपस्थित होते.
बांधकामाचे भूमिपूजन
मुखेड - नव्याने होत असलेल्या दापका गुंडोपंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन संत नामदेव महाराज दापकेकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटक म्हणून माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर होते. यावेळी माजी सभापती व्यंकटराव पाटील दापकेकर, सुभाष पाटील दापकेकर, ज्ञानोबा पाटील दापकेकर, सरपंच जयश्री जेठकोडे, उपसरपंच आशाबी शादुल, एम.जी.राठोड, संजय जोगदंड, ग्रामविस्तार अधिकारी विाकस पवार आदी उपस्थित होते.
तिबार पेरणीचे संकट
मालेगाव - पावसाने उघडीप घेतल्याने मालेगाव परिसरात तिबार पेरणीचे संकट कोसळले आहे. दुबार पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे मोर, वानर व इतर पक्षी उकरून खात आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. दुबार पेरणीनंतरही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
अवैध दारू विक्री बंद करा
किनवट - तालुक्यातील धानोरा (सीख) येथील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली जात आहे. सिंदखेड पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. तीन महिन्यापासून नागरिक दारू विक्री बंदसाठी प्रयत्नशील आहेत. हा प्रकार बंद न झाल्यास आंदोलनाची तयारी लोकांनी सुरू केली आहे.
नागरी सुविधांची मागणी
कुंडलवाडी - येथील प्रभाग क्रमांक १ मधील काही भागातील नवीन वसाहतीमध्ये सीसी रोड, नाल्या, पथदिव्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. या ठिकाणी नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी रहिवाशांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
वसंतराव नाईक यांना अभिवादन
मांडवी - किनवट तालुक्यातील पळशी येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने तुळजाई महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस नवीन राठोड, प्राचार्य राजेंद्र चौधरी, जिल्हा महिला काँग्रेसच्या सचिव जयश्री राठोड, सविता पवार, लता राऊलवार, चेतना पवार, ज्योत्सना चौधरी, शीला शेंडे, रत्नप्रभा नैताम, कविता डोंगरे, मेघा आवनूर, वनिता मुनेश्वर, गीता राठोड आदी उपस्थित होते.
न्या. जगताप यांचा सत्कार
धर्माबाद - प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने ॲड. पूजा चौहाण, भगवानसिंह चौहाण यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप दिला. यावेळी अनेक मान्यवर व बार कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.
कोरोना योद्धांचा सत्कार
उमरी - कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा डॉक्टर डेनिमित्त सत्कार करण्यात आला. डॉ.माधव विभुते, डॉ.एम.एन. चंदापुरे यांचा शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख साहेबराव पाटील शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
डॉक्टर डे साजरा
कुंडलवाडी - कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार प्रशाळेत डॉक्टर डेनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.प्रशांत सब्बनवार तर प्रमुख पाहुणे म्हणून बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव प्रा.डॉ. बालाजी कोंपलवार उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक कल्याण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन सुरेख चोंडीकर यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक नागनाथ चेटलुरे व अन्य उपस्थित होते.