शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:48+5:302020-12-22T04:17:48+5:30

गोलेगाव (पक) ता. लोहा येथील शेतकरी सचिन रामराव नाईकवाडे यांना गोलेगाव शिवारातच तीन एकर शेती जमीन आहे. बँकेचे कर्ज ...

Farmer commits suicide by consuming poison | शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

googlenewsNext

गोलेगाव (पक) ता. लोहा येथील शेतकरी सचिन रामराव नाईकवाडे यांना गोलेगाव शिवारातच तीन एकर शेती जमीन आहे. बँकेचे कर्ज तसेच खासगी सावकाराचे काही कर्ज घेऊन खरिपाची पेरणी आटोपली. खरीप पेरणीपूर्वी पाऊस चांगला झाला. पिकेही जोमात होते. मात्र शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने सचिन नाईकवाडे हे सतत चिंतेत होते. त्यांना बँकेचे कर्ज कसे फेडायचे ही चिंता सतावत होती. याच विवंचनेतून सचिन यांनी १९ रोजी शनिवारी सायंकाळी स्वतःच्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २० रोजी पहाटे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी माळाकोळी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Farmer commits suicide by consuming poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.