पिकविम्यात डावलल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:31 AM2019-05-17T00:31:49+5:302019-05-17T00:35:41+5:30

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १० लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी ४८ कोटी रुपये विमा कंपनीकडे भरले होते. परंतु, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अवघा १८ कोटी रुपयांचा पिकविमा मंजूर झाला आहे.

Farmers angry because avoid in crop loan | पिकविम्यात डावलल्याने शेतकरी संतप्त

पिकविम्यात डावलल्याने शेतकरी संतप्त

Next
ठळक मुद्देमाहूरमध्ये २० रोजी आंदोलन तर मुखेड, कंधार तालुक्यातील २१ ठिकाणी शनिवारी होणार रास्तारोको

नांदेड : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १० लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी ४८ कोटी रुपये विमा कंपनीकडे भरले होते. परंतु, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अवघा १८ कोटी रुपयांचा पिकविमा मंजूर झाला आहे. शेतक-यांचे मोठे नुकसान होऊनही ऐन दुष्काळात बळीराजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम विमा कंपनीसह प्रशासनाकडून झाल्याने या प्रकाराबाबत कमालीचा संताप व्यक्त होत आहे. या निषेधार्थ २० मे रोजी माहूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे तर शनिवारी १८ मे रोजी मुखेड, कंधार तालुक्यातील २१ ठिकाणी धरणे आंदोलन होणार आहे.
देगलूर तालुक्यातील आकडेवारी पाहता सात वर्षाचे उंबरठा उत्पन्नाचा आधार घेऊन ऐन दुष्काळात विमा कंपनीने सोयाबीन, मूग व उडीद पिकाचा विमा मंजूर केला नाही. ज्या पिकाचा कमी शेतक-यांनी विमा काढला होता त्या कापूस व संकरित ज्वारी या पिकाचा विमा मंजूर केला आहे. शासनाने सोयाबीन, मूग व उडीद पिकाचा विमा मंजूर करण्यात तात्काळ पावले उचलावीत अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरु, असा इशारा देगलूर तालुक्यातील शेतकºयांनी दिला आहे.
२०१६ साली देगलूर तालुक्यात अतिवृष्टी होवून सोयाबीन, मूग व उडीदाचे पीक शेतकºयांच्या डोळ्यादेखत गेले होते. त्यावेळी ज्या शेतकºयांनी आपल्या खरीप पिकाचा विमा उतरविला नव्हता अशा शेतकºयांना ५० टक्के विमा मिळाला होता. आता तर २०१६ सालापेक्षा भयानक दुष्काळ असताना विमा कंपनीने सोयाबीन, मूग व उडीद पिकाचा विमा नामंजूर करुन शेतकºयांना वाºयावर सोडले आहे. त्यामुळे शेतकºयांत नाराजी असून नगदी खरीप पिकाचा विमा मंजूर झाला नाही़ तर येणाºया विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम युती शासनाला भोगावे लागतील असे इशारे शेतकरी देत आहेत.
जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या आशेने सोयाबीन, मूग व उडीद या नगदी पिकाचा विमा उतरविला होता. मात्र विमा कंपनीने कापूस व संकरीत ज्वारी या दोन पिकाचा विमा सध्या मंजूर करून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या प्रकाराबाबत शेतकºयातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत़
काँग्रेस, मित्रपक्षातर्फे २१ ठिकाणी धरणे
पिकविमा परतावा न मिळाल्याने काँग्रेससह मित्रपक्ष आक्रमक झाले आहेत. शासनाबरोबरच पिकविमा कंपनीच्या विरोधात माजी आ. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून शनिवारी एकाच दिवशी मुखेड आणि कंधार तालुक्यातील २१ ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे बेटमोगरेकर यांनी सांगितले.
शेतकºयांना सरसकट पिकविमा मंजूर करावा, शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला रोजगार द्यावा, जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, पाणीटंचाईबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जि.प. चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्यासह मुखेडचे नगराध्यक्ष बाबूराव देबडवार आणि पदाधिकाºयांनी सांगितले. सदर आंदोलन सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत करण्यात येणार आहे.
या आंदोलनात जि़प़सदस्या सुशीलाबाई बेटमोगरेकर, मंगाराणी अंबुलगेकर, शेषेराव चव्हाण, राजन देशपांडे, सुभाष पाटील, बालाजी बंडे, प्रकाश उलगुलवार, बाबुराव गिरे, शिवराज आवडके यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी, पीआरपी, स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत़
३९९ शेतक-यांना केवळ १ लाख ७० हजार मंजूर
देगलूर : सहा मंडळात ३ हजार ५७ शेतक-यांनी कापसाचा विमा उतरविला होता. त्या शेतक-यांना विमा देण्यासाठी २ कोटी ३२ लाख रुपये तुटपुंजी मदत विमा कंपनीने दिली आहे. तर संकरित ज्वारीचा ३९९ शेतक-यांनी विमा उतरविला होता़ त्या शेतकºयांना केवळ १ लाख ७० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तूर पिकाचा विमा मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे़ मात्र त्यासाठी विमा कंपनीने एक छदाम रुपया सुद्धा अद्यापपर्यंत मंजूर केला नाही. या प्रकाराबाबत शेतक-यात संतापाची लाट आहे़
४८ तासात शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करा
माहूर : सर्वाधिक पिकविमा भरूनही नियमानुसार ४८ तासात शेतक-यांच्या खात्यात संबंधीत पिक विमा संरक्षीत रक्कम जमा झालेली नाही़ ही रक्कम तातडीने अदा करावी या मागणीकरीता संभाजी ब्रिगेडसह किसन ब्रिगेड आक्रमक झाली आहे़ याचा मागणीसाठी या दोन्ही संघटनासह शेतकरी बांधवांच्यावतीने २० मे रोजी माहूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येत असल्याचे अविनाश टनमने, सुनील वानखेडे, विलास गावंडे, दिलीप सुकले आदींनी सांगितले़

Web Title: Farmers angry because avoid in crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.