अर्धापूर तालुक्यातील शेतकरी वळतोय अद्रक लागवडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:47+5:302020-12-26T04:14:47+5:30
अर्धापूर :- तालुक्यातील शेतकरी अद्रक शेती लागवडीकडे वळत आहे तालुक्यातील बारसगाव शिवारात शेतकऱ्यांनी अद्रक पिकांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी ...
अर्धापूर :- तालुक्यातील शेतकरी अद्रक शेती लागवडीकडे वळत आहे तालुक्यातील बारसगाव शिवारात शेतकऱ्यांनी अद्रक पिकांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक काळात आधुनिक पध्दतीने शेती केल्यास मोठे उत्पादन होईल अशी माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली.
बारसगाव शिवारातील अल्पभूधारक व उच्च शिक्षित असलेले शेतकरी सिध्दार्थ सखाराम लोखंडे यांनी दीड एकर शेती मध्ये एक एकर हळद लागवड केली तर वीस गुंठ्यात अद्रक व हळदीमध्ये आंतरपीक शेवगा शेंगांची लागवड केली आहे. हळदीमध्ये आंतरपीक म्हणून शेवगा लागवड केली आहे. शेवग्याच्या शेंगा विक्रीतून दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पादन होत आहे. वीस गुंठ्यात अद्रक लागवड केली. काढणीस सात ते आठ महिन्यात येणारे पीक असून अद्रक लागवडीसाठी बी-बियाणे,औषध, मशागत खर्च ४० हजार रुपये असून वीस गुंठ्यात अद्रकाचे उत्पादन अडीच ते तीन लाखांपेक्षा जास्त होऊ शकते .शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केल्यास मोठे उत्पादन होईल.
हळदीमध्ये आंतरपीक म्हणून शेवगा या पिकाची लागवड केली तर शेतकऱ्यांना शेवग्यापासून उत्पादन सुध्दा मिळेल व हळद काढणीला त्याचे लाकूड हळद शिजविण्यासाठी सरपण म्हणून कामी येईल. शेतकऱ्यांनी ऑनलाईनच्या युगात ऑनलाईन पध्दतीने शेती केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल .तसेच शेतकऱ्यांनी अद्रक,हळद,शेवगा ही कमीत कमी खर्चात जास्त कसे उत्पादन होईल यासाठी कोणकोणते बियाणे,खते,औषध फवारणी केली याची माहिती सर्व शेतकऱ्यांना हवी तसेच भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान पिकांची लागवड पद्धत शेतकऱ्यांनी नवनवीन बदल शेतीसाठी केल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितच परिवर्तन घडून येणार असल्याची माहिती उच्च शिक्षित शेतकरी सिध्दार्थ लोखंडे यांनी यावेळी दिली आहे.
आंतरपिकातून लाखोंचं उत्पन्न
हळद पिकासोबत आंतरपीक म्हणून शेवगा लागवड केली आहे. जूनमध्ये लागवड व फेब्रुवारीमध्ये उत्पादन घेण्यात येते व नागपूर येथील बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळत असल्यामुळे तेथील बाजारपेठेत विक्री करत लाखोचे उत्पन्न आंतरपीक म्हणून घेतलेल्या शेवग्यामधून मिळते.
समूह शेती करावी
आपण आपल्या शेतामध्ये कोणती औषधी वापरली हे दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगावे व सर्वांनी एकत्र येऊन एकच पिकाची लागवड करावी व एकाच बाजारपेठेमध्ये एकदाच न्यावे त्यामुळे चांगला भाव व भरघोस उत्पन्न मिळू शकते.