शेतकरीच ज्वारीच्या शोधात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 01:00 AM2019-05-09T01:00:58+5:302019-05-09T01:01:26+5:30
गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसावर खरिपाचे पीक थोडेफार पदरात पडले. परंतु जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रबीची पेरणीच करता आली नाही. यामुळे बिलोली तालुक्यासह या परिसरात भरभरून होणारे ज्वारीचे उत्पन्न यावर्षी अत्यल्प झाले आहे.
सगरोळी : गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसावर खरिपाचे पीक थोडेफार पदरात पडले. परंतु जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रबीची पेरणीच करता आली नाही. यामुळे बिलोली तालुक्यासह या परिसरात भरभरून होणारे ज्वारीचे उत्पन्न यावर्षी अत्यल्प झाले आहे. परिणामी या भागातील शेतकऱ्यांनाच खाण्यासाठी ज्वारी शोधण्याची वेळ आली आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जात असे. काही वर्षांपासून नगदी पिकाकडे असलेला शेतकऱ्यांचा कल, ज्वारी पिकाबाबत वाढलेली उदासीनता व इतर पिकांच्या तुलनेत चांगला भाव देखील मिळत नसल्याने ज्वारीकडे शेतक-यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच गतवर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकºयांना खाण्यापुरतीदेखील ज्वारी निघू शकली नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबावरच ज्वारी विकत घेवून खाण्याची वेळ आली आहे.
शेतकरी कुटुंबच ज्वारीच्या शोधासाठी अडत दुकानात उभे राहून ज्वारीचे भाव विचारत आहेत. दरम्यान, मागीलवर्षी दोन हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दराने मिळणारी ज्वारी यंदा मात्र तीन ते साडे तीन हजारांच्या आसपास जाऊन पोहोचली आहे.
या प्रकाराने शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आता ही परिस्थिती पाहता गेल्या काही वर्षांपूर्वी गव्हाची पोळी दिसावी तर श्रीमंताच्या घरी अशी अवस्था होती़ आता मात्र ज्वारीची भाकर दिसावी तर श्रीमंताच्या घरी असे दिसून येत आहे. कारण ज्वारीचे भाव व रेशनच्या गव्हाचे भाव पाहता जवळपास दीड ते दोन हजारांचा फरक आहे. यामुळे बºयाच कुटुंबात गव्हाच्या पोळ्या दिसू लागल्या आहेत.
ज्वारीमध्ये प्रथिने
ज्वारीमध्ये प्रथिने (काबोर्हायड्रेट ) सर्वाधिक असून खनिजाचे (मिनरल) प्रमाणही भरपूर आहे. याशिवाय (फायबर) तंतुमय पदार्थ सर्वाधिक असल्याने ज्वारी पचणासाठी उत्तम आहे.ज्वारीमध्ये असलेल्या निअॅसीनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. शिवाय यात फायटोकेमिकल साचल्याने हृदय रोगही टाळता येतो. ज्वारीत असलेले पोटॅशियम मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. लाल पेशी वाढण्यास मदत होते. म्हणून ज्वारी खाणे अरोग्यास उत्तम -डॉ.नागेश लखमावार, अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय बिलोली़
पाऊस नसल्याने रबीही नाही
इतर पिकांच्या तुलनेत रेशन दुकानातून दिले जाणारे गहू प्रतिकुंटुब महिनाभर पुरतील असेही नाही. यापुढे रेशन दुकानातून ज्वारी देण्यात यावे, अशीही मागणी होताना दिसत आहे. चांगला भाव मिळत नाही. शिवाय रानडुक्करासारख्या जंगली प्राण्यांचे जास्तीचे उपद्रव. त्यामुळे मी दरवर्षी खाण्यापुरतेच ज्वारीचे पीक घेत असतो. परंतु यंदा पाऊसच पडला नसल्याने रबीची पेरणी करता आली नाही. परिणामी यावर्षी ज्वारी विकत घेण्याची पाळी माझ्यावरच आली, असे सधन शेतकरी व्यंकटराव सिडनोड यांनी सांगितले.
या प्रकाराने शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आता ही परिस्थिती पाहता गेल्या काही वर्षांपूर्वी गव्हाची पोळी दिसावी तर श्रीमंताच्या घरी अशी अवस्था होती़ आता मात्र ज्वारीची भाकर दिसावी तर श्रीमंताच्या घरी असे दिसून येत आहे. कारण ज्वारीचे भाव व रेशनच्या गव्हाचे भाव पाहता जवळपास दीड ते दोन हजारांचा फरक आहे. यामुळे बºयाच कुंटुबांत गव्हाच्या पोळ्या दिसू लागल्या आहेत.