शेतकऱ्यांची शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ; नोंदणीपैकी १० टक्केही तूर खरेदी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 07:29 PM2020-03-03T19:29:14+5:302020-03-03T19:30:33+5:30

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीनबरोबर तुरीचे उत्पन्नही चांगल्या प्रमाणात होत आहे़

farmers avoid to sell crop to Government Shopping Center at Nanded | शेतकऱ्यांची शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ; नोंदणीपैकी १० टक्केही तूर खरेदी होईना

शेतकऱ्यांची शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ; नोंदणीपैकी १० टक्केही तूर खरेदी होईना

Next
ठळक मुद्देनोंदणीसाठी १५ मार्चपर्यंतची मुदत

- श्रीनिवास भोसले

नांदेड:  शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमालाची विक्री करता यावी म्हणून जिल्ह्यात जवळपास १३ ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ परंतु, शासकीय खरेदी केंद्रासाठीच्या जाचक अटी आणि विलंबामुळे बहुतांश तूर उत्पादक शेतकऱ्यांनी सदर केंद्रांकडे पाठ फिरविली आहे़ आजपर्यंत केवळ ७८५ शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपली तूर विकली आहे़ 

नांदेड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीनबरोबर तुरीचे उत्पन्नही चांगल्या प्रमाणात होत आहे़ कापसामध्ये तूर घेण्याबरोबर स्वतंत्र तुरीचा पेरा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे़ नांदेड जिल्ह्यात दुहेरी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने अंतर्गत पीक म्हणून बहुतांश शेतकरी तूर, मूग, उडीद या पिकांना प्राधान्य देतात़ 
शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विकता यावा आणि त्यांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आधारभूत भाव मिळावा या उद्देशाने शासनाने जवळपास १३ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले आहेत़ केंद्र शासनाने तुरीसाठी प्रतिक्विंटल ५ हजार ८०० रूपये भाव जाहीर केला आहे़ परंतु, तुरीची आर्द्रता आणि गुणवत्तेनुसार भाव देत व्यापाऱ्यांसह खरेदी केंद्राकडूनदेखील कमी भावानेच तूर खरेदी केली जाते़ त्यातच आॅनलाईन नोंदणी आणि त्यानंतर खरेदी केंद्राकडून मोबाईलवर एसएमएस आल्यानंतर खरेदी केंद्रावर माल घेऊन जायचा असतो़ अशा किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे बहुतांश शेतकरी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवित असल्याचे पाहायला मिळत आहे़ 
नांदेड जिल्ह्यातील ११ हजार ४४२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ त्यापैकी १ हजार ४९९ शेतकऱ्यांना आजपर्यंत खरेदी केंद्रावर शेतमाल आणण्यासाठी केंद्राकडून एसएमएस पाठविण्यात आला़ त्यातही केवळ ७८५ शेतकऱ्यांनी आपला माल खरेदी केंद्रावर आणला आणि विक्री केला़ जवळपास ३ हजार ८८७ क्विंटल तूर खरेदी आजपर्यंत करण्यात आली आहे़ त्यापैकी एकाही शेतकऱ्यास आजपर्यंत तुरीचे चुकारे अदा करण्यात आलेले नाहीत़ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि केंद्रावर माल खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या यात मोठी तफावत आहे़  बहुतांश शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीकडे पाठ फिरविली आहे़ 


नोंदणी ११४४२ शेतकऱ्यांची; खरेदी ७८५
नांदेड जिल्ह्यातील आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर शेतमाल खरेदीसाठी जिल्ह्यात सुरू केलेल्या १३ खरेदी केंद्रांवर ११ हजार ४४२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ त्यापैकी १ हजार ४९९ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले असून केवळ ७८५ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली़ च्नांदेड खरेदी केंद्रावर ८४५ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली, त्यापैकी ४० शेतकऱ्यांचा माल आजपर्यंत खरेदी करण्यात आला़ तसेच मुखेड केंद्रावर १४७३ पैकी ११३ शेतकऱ्यांचा माल खरेदी केला़ हदगाव - २ हजार ४०६ पैकी १४०, किनवट - २ हजार ३२१ पैकी ५९, नायगाव - ९८० पैकी १४०, भोकर - ७५० पैकी ०, धर्माबाद - ८५४ पैकी १३९, धानोरा ता़ धर्माबाद - ६२८ पैकी ८९, करडखेड ता़देगलूर - १०० पैकी ०, बरबडा ता़ नायगाव - ३१ पैकी ०,  लोहगाव ता़बिलोली - ४७८ पैकी १८,  नरनाली ताक़ंधार - ३१० पैकी ९,  मांडवी ता़ किनवट - २६६ पैकी ३८ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे़ 

Web Title: farmers avoid to sell crop to Government Shopping Center at Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.