पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचे सोमवारी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:32 AM2020-12-13T04:32:30+5:302020-12-13T04:32:30+5:30
अतिवृष्टीने बाधित क्षेत्रामध्ये झालेल्या नुकसानीमुळे पीक कापणी प्रयोग रद्द करून सरसकट व जोखीम रक्कमे इतकी (सोयाबीन हेक्टरी ४५ हजार ...
अतिवृष्टीने बाधित क्षेत्रामध्ये झालेल्या नुकसानीमुळे पीक कापणी प्रयोग रद्द करून सरसकट व जोखीम रक्कमे इतकी (सोयाबीन हेक्टरी ४५ हजार रूपये) विमा भरपाई अदा करा, शासनाशी झालेल्या विमा कराराचा भंग करणाऱ्या व शेतकऱ्यांना विमा भरपाई नाकारणाऱ्या इफ्को टोकियो कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करा, शेतकरी दाखल करीत असलेल्या तक्रार अर्जावर जिल्हास्तरीय सुनावणी करून शेतकऱ्यांना तात्काळ विमा भरपाई अदा करा, पीकविमा करारातील जाचक अटी रद्द करून या योजनेची पुनर्रचना करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करत असल्याची माहिती शेतकरी-कष्टकरी संघर्ष समितीचे जिल्ह्याचे निमंत्रक कैलास येसगे कावळगावकर यांनी दिली. शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा मिळविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन पीकविमा प्रश्नाचे अभ्यासक काँम्रेड राजन क्षीरसागर, इंटकचे जिल्हा सचिव काँ. प्रदिप नागापूरकर, शेकापचे जिल्हाध्यक्ष सुभाषिश कामेवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हाणमंत राजेगोरे, माकपचे जिल्हा सचिव काँ. गंगाधर गायकवाड, माणिकराव कदम, प्रहार जनशक्ती पक्षाचे कैलास येसगे, दिगंबर खपाटे, शिवकुमार सोनाळकर, भुजंग पावडे यांनी केले आहे.