शेतकऱ्यांनी शासन योजनांतून अर्थोन्नत्ती साधावी - हंबर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:39+5:302021-07-02T04:13:39+5:30

हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे ...

Farmers should make money from government schemes - Humberde | शेतकऱ्यांनी शासन योजनांतून अर्थोन्नत्ती साधावी - हंबर्डे

शेतकऱ्यांनी शासन योजनांतून अर्थोन्नत्ती साधावी - हंबर्डे

Next

हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे व नांदेड पंचायत समितीचे माजी सभापती सुखदेव जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ शेतकऱ्यांना फवारणी यंत्र, सुरक्षा किटचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात आ. हंबर्डे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, तालुकाध्यक्ष ॲड. नीलेश पावडे, नागोराव आढाव चिमेगावकर, महिला प्रदेश सरचिटणीस सुमती व्याहळकर, नगरसेवक किसनराव कल्याणकर, शिवाजीराव पावडे, भोकर विधानसभा अध्यक्ष मदन देशमुख, उत्तर विधानसभा अध्यक्ष सत्यजित भोसले, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी बालाजी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, ॲड. नीलेश पावडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाला सरपंच गोविंदराव आढाव, सत्यजित भोसले, वाडीचे सरपंच रमेश लोखंडे, संतोष लेंडाळे, प्रभाकर जाधव, गंगाधर सोनटक्के आदींची उपस्थिती होती. माजी सभापती सुखदेव जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संतोष देवराये यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठविल्यानंतर तत्कालीन भाजपा सरकारने डी. पी. सावंत यांचे निलंबन केले होते. जगाच्या पोशिंद्यांच्या हितासाठी आपली आमदारकी गेली तरी बेहत्तर अशी घोषणा करत शेतकऱ्यांसाठी विधानसभेत सतत आवाज उठवणारे लोकहितवादी नेतृत्व म्हणून माजी मंत्री, तत्कालीन आमदार डी. पी. सावंत यांच्या कार्याचा गौरव करावा लागेल, अशा भावना नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Farmers should make money from government schemes - Humberde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.