कलिंगड लागवडीला शेतकरी धजावेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:19+5:302020-12-26T04:14:19+5:30
टरबूज आणि कासराळी असे जणू समीकरणच बनलेल्या कासराळीत गेल्या पाच वर्षांत टरबूज लागवडीचा उच्चांक वर्षागणिक वाढला. पाच महिन्यांत २ ...
टरबूज आणि कासराळी असे जणू समीकरणच बनलेल्या कासराळीत गेल्या पाच वर्षांत टरबूज लागवडीचा उच्चांक वर्षागणिक वाढला. पाच महिन्यांत २ तोडे आणि हमखास दुहेरी लाभ अशी उत्पनाची हमी असलेल्या टरबुजाची लागवड कासराळीत पहिल्यांदा भागवत लोकमनवार यांनी करून इतर शेतकऱ्यांना लागवडीस
प्रवृत्त केले. तद्नंतर उत्पादनाने शेतकऱ्यांचा कल अधिकच वाढला. एकापेक्षा एक अशा सरस उत्पादन वृद्धीने शेतकऱ्यांना या पिकाची गोडी लागली.
पहिल्यांदा ९० दिवसांचे हे पाणीदार फळ दुसऱ्यांदा ७० ते ७५ दिवसांतच तोडणीला येत असे. उन्हाळा आणि रमजान डोळ्यासमोर ठेवून शेतकरी पिकाची लागवड व तोडणी करीत असत. ४ ते ७ किलो वजनाच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाने या फळाला प्रचंड मागणी वाढली. बसवंत कासराळीकर या शेतकऱ्याचे टरबूज दोन वर्षांपूर्वी नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू, जम्मूपर्यंत पोहोचले होते. प्रचंड उत्पादन आणि अपेक्षेहून अधिक झालेल्या लाभाने गतवर्षीही हजाराहून अधिक क्षेत्रात टरबूज लागवड झाली. मात्र, मार्च महिन्याअखेर टरबूज ऐन तोडणीवर असताना कोरोना संसर्गामुळे लाॅकडाऊन पडले. बाजारपेठाच बंद झाल्याने कासराळीतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. खर्च केलेली रक्कमही निघणे मुश्कील झाले होते. अनेकांनी तर टरबूज फळाच्या शेतीत जनावरे सोडली होती, तर काहींनी मोफत वाटले.