थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:22+5:302021-06-16T04:25:22+5:30
शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात गेले असता ...
शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात गेले असता अधिकारी उपस्थित नसल्याने शिष्टमंडळाने दोन तास ठिय्या देऊन उपसंचालकांच्या खुर्चीला निवेदन दिले. त्यानंतर कार्यालय अधिकारी वाडेकर आले असता त्यांना घेराव घालून आपल्या मागण्या मांडल्या. २० तारखेपर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम दिली नाही तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात स्वत:ला कोंडून घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले, सरपंच बालाजी पाटील भायेगावकर, तुकाराम माचनवाड, नागोराव घार्गे, विश्वंभर माचनवाड, दत्ता बुचडे, दत्ता गुंडे, बालाजी कुकुर्ले, एकनाथ माचेवाड, माधव राहिरे, सीताराम गव्हाणे, दिगंबर कुकुर्ले, संजय गव्हाणे, बालाजी गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.