शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेऊन खावी लागणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:59+5:302021-08-12T04:22:59+5:30
नांदेड जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ५३ हजार २५० हेक्टर असताना केवळ २१ हजार ३५२ हेक्टरवर म्हणजेच ३९.१३ टक्के पेरणी ...
नांदेड जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ५३ हजार २५० हेक्टर असताना केवळ २१ हजार ३५२ हेक्टरवर म्हणजेच ३९.१३ टक्के पेरणी झाली आहे. त्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने ज्वारी पिकाचे अताेनात नुकसान झाले आहे. एकीकडे साेयाबीनचा पेरा वाढत असताना ज्वारीचे पेरणी क्षेत्र घटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काेट....
पाण्याअभावी ज्वारीचे पीक घेतले जायचे; परंतु मागील काही वर्षांत विहीर व बाेअरला पाणी आल्याने गव्हाचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्वारीचा पेरा घटला आहे.
- नारायणराव कदम, शेतकरी
ज्वारीला पूर्वीप्रमाणे मागणी नाही. त्याचबराेबर जनावरांना चारा म्हणून कडब्याचा वापर हाेत हाेता; परंतु जनावारांचीही संख्या घटल्याने ज्वारीऐवजी साेयाबीन पेरले जात आहे.
- रामराव चंदेल, शेतकरी
का फरविली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ?
जनावरांची संख्या घटल्याने चारा लागत नाही, ज्वारीच्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट हाेत असल्याने शेतकरी ज्वारीकडे दुर्लक्ष करून गहू व साेयाबीनचा पेरा अधिक करीत आहेत.
- आर.बी. चलवदे, अधीक्षक कृषी अधिकारी