टायर फुटल्याने बस मिनी ट्रकवर धडकून भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, १४ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 08:33 PM2022-09-26T20:33:14+5:302022-09-26T20:33:55+5:30
धावत्या कंधार - नागपुर बसचा समोरील टायर फुटला
नांदेड : अचानक टायर फुटल्याने धावती बस समोरून येणाऱ्या मिनी ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघात एकजण ठार झाल्याची घटना नागपुर - तुळजापूर रोडवरील मार्लेगावजवळ दुपारी साडेचार वाजता घडली. या अपघातात बसमधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत.
कंधार - नागपुर जाणारी महामंडळाची बस (क्र एम एच ४० एन ९६३४) उमरखेडकडे जात होती. अचानक उजवीकडील टायर फुटल्याने बस हदगांवकडे निघालेल्या मिनी ट्रकवर (क्र एम एच २६ एच ९८२१) धडकली. या भीषण अपघातात मिनी ट्रकमधील मजुर संतोष काळबांडे ( ३८ , महात्मा फुले, हदगाव) याचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. माहिती कळताच उमरखेड पोस्टेचे पोउप निरिक्षक प्रशांत देशमुख, अकुंश दरबस्तेवार, नरेन्द्र पुंड आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. या प्रकरणी ठाणेदार अमोल माळवे अधिक तपास करत आहेत.
जखमी प्रवासी:
बसचालक विठ्ल पुंडे ( ४० ), वच्छला काळे ( ७ ५ ) , जनाबाई काबंळे ( ६० ) , कपिल साळवे ( २९ ) , मारोती शिंदे ( ६५ ) , मारोती नरवाडे (७५) , रोशणी जामोदकर ( ३६ ) , सिमा जामोदकर ( २५ ) सविता नरवाडे ( ३७ ) , परशुराम पांचाळ ( ३ ५ ) हे जखमी झाले. जखमींवर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मिनि ट्रकमधील अन्य ४ मजूर हदगाव येथे उपचार घेत आहेत.