मागासवर्गीय कुटुंबावर जीवघेणा हल्ला प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:17 AM2020-12-24T04:17:41+5:302020-12-24T04:17:41+5:30
जखमी विद्यार्थ्यांला नांदेडला हलविले लोहा : लोहा शहरातील आयटीआय परिवारात माळरान गायरान वडिलोपार्जित वहित करून खाणाऱ्या मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या कुटुंबियांवर ...
जखमी विद्यार्थ्यांला नांदेडला हलविले
लोहा : लोहा शहरातील आयटीआय परिवारात माळरान गायरान वडिलोपार्जित वहित करून खाणाऱ्या मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पोलेवाडी चे आरोपीं गेल्या सहा दिवसा पासून फरारच आहेत. शोध सुरू आहे, अशी धून पोलीस यंत्रणा वाजवीत आहे. दुसरीकडे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या जोंधळे कुटुंबियातील रोहन मधुकर जोंधळे (वय २२) हा घटना घडली तेव्हापासून हॉस्पिटलमध्ये असून त्याला पुन्हा उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले होते.
किडनीवर सूज व बरगड्यात रक्त सांगळले आहे. सामाजिक संयम ढळू न देता पोलिसांनी आरोपीना तात्काळ अटक करावी अन्यथा झाला अन्याय आता सहन करणार नाही. आरोपींना आंदोलन करू असा इशारा आंबेडकरी जनतेनी शहरातील विविध संघटनांनी दिला आहे.
मागील आठवड्यात आयटीआय परिसरात जोंधळे कुटुंब स्वतःच्या शेतात बोअरवेलमध्ये मोटार टाकीत होते तेव्हा सायंकाळी पोले वाडीच्या टोळक्याने ज्यात दता बाजगिर, संदीप बाजगिर, धीरज हाके, वैभव हाके , कमलाकर बाजगिर व इतर सात आठ जण समावेश होता त्यांनी शेतात काम करणाऱ्या या जोंधळे कुटुंबियांना लोखंडी गजाळी, लाकडी काढ्या फायटर, दगड धोंड्यानी डोक्यात पाठीत व गुप्तांगावर बेदम मारहाण केली यात मंगेशला एका झुडपातडात फेकून दिले अर्ध्या तासाहून अधिक काळ या टोळक्यानी धुमाकूळ घातला. जातीवाचक शिवीगाळ करीत प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी लोहा प्राणघातक हल्ला कलम ३०७ भदवि व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला पण यातील आरोपी गेल्या सहा दिवसा पासून फरार आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक यांची वार्षिक तपासणी कंधार पोलीस उपविभागात होती त्यामुळे पोलीस यंत्रणा इन्सपेक्सनमध्ये त्यामुळे थोडा विलंब झाला असे पोलीस अधिकाऱ्यांनी कबूल केले पण एक दोन दिवसात आरोपी गजाआड होतील असे सांगण्यात आले.