मुदखेड-नांदेड रोडवर ट्रक-ऑटोरिक्षाचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर जखमी

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Published: March 30, 2023 12:16 PM2023-03-30T12:16:31+5:302023-03-30T12:17:16+5:30

हा अपघात इतका भीषण होता की ऑटोचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Fatal truck-autorickshaw accident on Mudkhed-Nanded road; 4 died on the spot, 5 seriously injured | मुदखेड-नांदेड रोडवर ट्रक-ऑटोरिक्षाचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर जखमी

मुदखेड-नांदेड रोडवर ट्रक-ऑटोरिक्षाचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर जखमी

googlenewsNext

मुदखेड : तालुक्यातील मुदखेड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरु आहे. इजळी- मुगट दरम्यान आज सकाळी ११ वाजता ऑटोरिक्षा आणि ट्रकच्या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की ऑटोरिक्षाचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुदखेड ते नांदेड रोडवरील इजळी- मुगट दरम्यान रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ ऑटोरिक्षास ट्रकने जबर धडक दिली. यात ऑटोमधील एक लहान बालक, महिला आणि अन्य दोघे असा‌ चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की ऑटोचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. 

अपघातस्थळी जखमींचा आक्रोश सुरु होता. हे दृश्य पासून अनेक नागरिकांनी मदत कार्य करत जखमींना शासकीय रुग्णालयात रवाना केले. अनेक जण गंभीर जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत आणि जखमींची अद्याप नावे कळू शकली नाहीत.

Web Title: Fatal truck-autorickshaw accident on Mudkhed-Nanded road; 4 died on the spot, 5 seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.