नांदेडात पिता-पुत्र गेले वाहून, अन्य दोघांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:23 AM2021-09-08T04:23:48+5:302021-09-08T04:23:48+5:30

जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात मंगळवारी पहाटे पावसाचे जोरदार आगमन झाले असून नांदेड जिल्ह्यातील ८० महसूल ...

The father and son were taken to Nanded and the bodies of the other two were found | नांदेडात पिता-पुत्र गेले वाहून, अन्य दोघांचे मृतदेह सापडले

नांदेडात पिता-पुत्र गेले वाहून, अन्य दोघांचे मृतदेह सापडले

Next

जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात मंगळवारी पहाटे पावसाचे जोरदार आगमन झाले असून नांदेड जिल्ह्यातील ८० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. गावालगत असलेल्या नदी-नाल्यांसह ओढ्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. यामध्ये अर्धापूर तालुक्यातील शेलगावला मेंढला नाल्याचे पाण्याने वेढले होते. तर आरळी गावाचा ही संपर्क तुटला आहे. गोदाकाठच्या अनेक गावात पाणी शिरले असून हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अर्धापूर, कंधार, लोहा, मुदखेड, माहूर आदी तालुक्यातील चांगला पाऊस झाला असून नदी नाल्यांना पूर आला आहे. नदी-नाल्यांच्या काठावर असलेल्या शेकडो एकरातील पिके वाहून गेली. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगल्याने जनावरांचे पावसापासून संरक्षण झाले आहे.

चौकट.....

विष्णुपुरीचा १२ तर लिंबोटीचे १५ दरवाजे उघडले

नांदेड शहर परिसरात असलेल्या गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर उर्ध्व मानार प्रकल्पाच्या लिंबोटी धरणाचे १५ दरवाजे उघडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आमदाराच्या कुटुंबातील पिता-पुत्र गेले वाहून

मुखेड शहरापासून जवळ असलेल्या मोती नाल्यात कार वाहून गेली. या कारमध्ये आमदार डॉ. तुषार राठोड यांचे चुलतभाऊ भगवान राठोड आणि त्यांचा मुलगा संदीप राठोड हे दोघे पुरात वाहून गेले. या गाडीतील चालक उद्धव देवकत्ते यांनी पुरात वाहत असताना झाडाचा आसरा घेत स्वतचे प्राण वाचविले. तर दुसऱ्या घटनेत मुखेड तालुक्यातील मेथी येथील यादव जळबा हिवराळे (वय ६०) हे गवताचा भारा घेऊन घराकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावरून वाहून गेले. त्यांचा मृतदेह गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सापडला. तर गोदावरी नदी पात्रात नांदेडात एक जणाचा मृतदेह आढळून आला आहे. परंतु, त्याची ओळख पटलेली नाही.

Web Title: The father and son were taken to Nanded and the bodies of the other two were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.