पिता-पुत्राचा किरोडा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:29 AM2018-09-07T00:29:24+5:302018-09-07T00:30:00+5:30
लग्नानंतर कुटुंबियासह मुळगावी किरोडा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी आलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी घडली़ तेलंगणातील निझामबाद येथून ते देवदर्शनासाठी आले होते़ तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला़ यावेळी काठावर असलेले त्याचे वडिल त्याला वाचविण्यासाठी गेले असता त्यांचाही बुडून मृत्यु झाला़ यातील मयत शेख गफारअली शेख याचा चार दिवसापूर्वीच विवाह झाला होता़
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहा : लग्नानंतर कुटुंबियासह मुळगावी किरोडा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी आलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी घडली़ तेलंगणातील निझामबाद येथून ते देवदर्शनासाठी आले होते़ तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला़ यावेळी काठावर असलेले त्याचे वडिल त्याला वाचविण्यासाठी गेले असता त्यांचाही बुडून मृत्यु झाला़ यातील मयत शेख गफारअली शेख याचा चार दिवसापूर्वीच विवाह झाला होता़
किरोडा येथील मुळ रहिवाशी आसलेले शेख कुटूंबीय मागील अनेक वर्षापूर्वी तेलंगणा राज्यातील निझामबाद येथील उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास होते. शेख सत्तारअली शेख गफारअली (वय ६०, रा. खोजा कॉलनी, निझामबाद) यांच्या शेख गफारअली शेख सत्तारअली (वय २४) या मुलाचा २ सप्टेंबर रोजी विवाह झाला होता. त्यानिमित्त शेख कुटूंबीय त्यांच्या मुळ गावी किरोडा येथील सरवरे मगदुम दर्गा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी ६ रोजी आले होते. दुपारी दीड वाजेसुमारास शेख गफारअली हा पोहण्यासाठी तलावात उतरला़ परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडत होता़ त्याला वाचविण्यासाठी पित्यानेही पाण्यात उडी घेतली़ मात्र दोघेही पिता-पुत्र पाण्यात बुडून मृत्यू पावले. बाजुस असणाऱ्या शेख कुटूंबीयातील महिलांनी आरडा-ओरड केली़ काहींनी तलावात उड्याही घेतल्या़ परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. मयत बुडाल्याने त्यांचे शव पाण्याच्या तळाशी होते. परंतु नेमके कोठे आहेत हे कळत नसल्याने किरोड्यातील तरूण, गोताखोर व स्वत: पोलिस अधिकाºयांसह कर्मचारी तलावात उतरून शोध घेत होते. तीन साडेतीन तासांच्या अथक परिश्रमानंतर दोघांचेही शव आढळले.
घटनास्थळी तहसीलदार विठ्ठल परळीकर, पो.नि. अभिमन्यु साळुंके, पो.उपनि. असद शेख, पोहेकाँ पठाण, मंडळ अधिकारी आर.जी. जहागीरदार, के.जी. भोसीकर सरपंच भीमराव जोंधळे, नगरसेवक शेख शरफोद्दीन, सय्यद मलंग आदींनी भेट दिली. मयतांचा शोध घेण्यासाठी सपोनि वैजनाथ मुंढे व पोकाँ. माधव डफडे यांनी तलावात उतरून शोध घेतला. सोबत कंधार येथील भोई समाजाचे गोताखोर नंदकिशोर बामणवाड, दाऊ मेकलवाड यांनी प्रयत्न केले. उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मयतांचे शव लोहा ग्रामीण रूग्णालयात आणले होते.
चार दिवसांपूर्वी विवाह
किरोडा येथील रहिवाशी असलेले शेख कुटुंबिय उदरनिर्वाहसाठी निझामाबाद येथे राहतात़ शेख गफार अली शेख याचा सहा दिवसापूर्वीच म्हणजेच २ सप्टेंबर रोजी विवाह झाला होताा़ मुळगावी सरवरे मकदुम येथे दर्शन व नवस फेडण्यासाठी ते आले होते़ मात्र तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यु झाला़