कासराळीतील नादुरुस्त हातपंप तब्बल चार वर्षांनी झाले दुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:32+5:302021-01-02T04:15:32+5:30
येथील प्रभाग क्रमांक पाचमधील माधव लंके यांच्या घरानजीक हातपंप आहे. सदर हातपंपाचे पाणी या वस्तीतील अनेकांना मिळत होते. या ...
येथील प्रभाग क्रमांक पाचमधील माधव लंके यांच्या घरानजीक हातपंप आहे. सदर हातपंपाचे पाणी या वस्तीतील अनेकांना मिळत होते. या वस्तीत अनेकांकडे ग्रामपंचायतीचे नळ कनेक्शन नसल्याने हा हातपंप या प्रभागातील लोकांना मोठा आधार होता. मुख्य रस्त्यानजीक असलेल्या लोकांकडेच नळ कनेक्शन आहेत. मात्र, रस्त्याच्या बाजूला वस्तीमध्ये नळ नाहीत. ग्रामपंचायतीने मागणी करूनही कनेक्शन देण्याची तसदी घेतली नाही. वीजपुरवठा खंडित झाला तरी हातपंपाचे पाणी मिळत होते. सध्या वीजपुरवठा खंडित झाला की पाणी कासराळीत कुठेच मिळत नाही, ही परिस्थिती असताना हातपंप येथे आधार होता. मात्र तो गत चार वर्षांपासून नादुरुस्त झाल्याने याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. तब्बल चार वर्षांनंतर दोन दिवसांपूर्वी येथे हातपंप दुरुस्त करण्यात आले. याशिवाय अन्य एका बसस्थानकाजवळील हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली असून, कासराळीत अन्य प्रभागांत नादुरुस्त हातपंप सुरू करण्याची तयारी आता ग्रामपंचायतीने चालविली आहे.