दिवाळीच्या तोंडावर एफडीएचा कारवाईचा धमाका; ६६ अन्न पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेकडे

By श्रीनिवास भोसले | Published: November 10, 2023 03:58 PM2023-11-10T15:58:08+5:302023-11-10T15:58:27+5:30

दिवाळीनिमित्त अन्न पदार्थाची खरेदी करताना ही खबरदारी घ्या

FDA bursts into action ahead of Diwali; 66 food samples to the laboratory | दिवाळीच्या तोंडावर एफडीएचा कारवाईचा धमाका; ६६ अन्न पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेकडे

दिवाळीच्या तोंडावर एफडीएचा कारवाईचा धमाका; ६६ अन्न पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेकडे

नांदेड : दिवाळीमध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांची खरेदी करण्यात येते. त्या पदार्थामध्ये भेसळ करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये,यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड , रमाकांत पाटील ,सतीश हाके ,हृषीकेश मरेवार ,अनिकेत भिसे ,सहायक आयुक्त (अन्न) संजय चट्टे व राम भरकड व सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. 

नांदेड जिल्ह्यात १ सप्टेंबर पासून  ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेतर्गत किरकोळ विक्रेता, वितरक, उत्पादक, मिठाई विक्रेता दुध विक्रेते, किराणा अन्न पदार्थ इत्यादी ६६ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यामध्ये तेल, मिठाई, रवा, मैदा, बेसन, मिरची पावडर, हळद पावडर, तूप, दुध इत्यादींचा समावेश आहे.  विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविलेल्या अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्रलंबित असून, तो प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.              

या दरम्यान ६९ किलो खवा  व १७८ किलो  दही असा एकूण २८२२०रुपये किंमतीचा साथ जप्त करून नष्ट करण्यात आला.तर भेसळीच्या संशयावरून विविध प्रकारच्या एकूण ५६७८ किलो खाद्य तेलाचा रु ५,७६,६१२/- किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे .या सोबतच प्रतिबंधित पदार्थाच्या दोन कारवाईमध्ये एकूण १० लाख १० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात  आला आहे.अन्न पदार्थमध्ये भेसळ आढळून आल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियम व नियमनाचे अनुषंगे संबंधित अन्न पदार्थ विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल. 

दिवाळीनिमित्त अन्न पदार्थाची खरेदी करताना ही खबरदारी घ्या
मिठाई ताजी असल्याची खात्री करूनच खरेदी करा. त्याचे पक्के बिल घ्यावे. परवानाधारक, नोंदणीधारक पेढीकडूनच अन्न पदार्थाची खरेदी करावी. अनोळखी व्यक्तीकडून तसेच भडक खाद्यरंग असलेली मिठाई खरेदी करू नये. खवा-मावा यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन २४ तासांच्या आत करावे. मिठाईवर बुरशी आढळून आल्यास नष्ट करावी. मिठाई खराब झाल्याची शंका आल्यास ती नष्ट करावी, उघड्यावरचे अन्न पदार्थ खरेदी करण्याचे टाळावे. पॅकबंद अन्न पदार्थ खरेदी करताना बॅच नंबर, बेस्ट बिफोर दिनांक, एक्सपायरी दिनांक तपासून खरेदी करावे, खाद्यतेलाचे टिन खरेदी करताना ते गंजलेले असू नयेत. ते खरेदी करू नयेत. यानंतरही अन्न पदार्थ, मिठाई खरेदी करताना शंका आल्यास अन्न व औषध प्रशासन च्या टोल फ्री क्रमांक १८०० २३० २१८ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) संजय चट्टे यांनी केले आहे.

Web Title: FDA bursts into action ahead of Diwali; 66 food samples to the laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.