ताप, सर्दी, खोकल्याने किनवटकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:06 AM2018-10-12T01:06:29+5:302018-10-12T01:06:50+5:30

तालुक्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे गावोगावी ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकदु:खी या सारख्या आजाराने शहरासह ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दवाखान्यात गोळ्या औषधांचा पुरवठाच नसल्याने ओपीडी करावी कशी? ही चिंता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाºयांना पडला तर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची वाणवा व तपासणी उपकरणे हाताळणी करणारे तंत्रज्ञ नसल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Feeling cold, cold, coughing | ताप, सर्दी, खोकल्याने किनवटकर त्रस्त

ताप, सर्दी, खोकल्याने किनवटकर त्रस्त

Next
ठळक मुद्देओपीडी चालवायची कशी? डॉक्टरांना पडला प्रश्न, जि.प.आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : तालुक्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे गावोगावी ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकदु:खी या सारख्या आजाराने शहरासह ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दवाखान्यात गोळ्या औषधांचा पुरवठाच नसल्याने ओपीडी करावी कशी? ही चिंता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाºयांना पडला तर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची वाणवा व तपासणी उपकरणे हाताळणी करणारे तंत्रज्ञ नसल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत.
किनवट तालुक्यात १९१ गांवे १०५ वाडीतांडे असून २ लक्ष ४७ हजार ७८६ लोकसंख्येला आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६५ आरोग्य उपकेंद्र, एक नागरी दवाखाना, तसेच राज्याच्या आरोग्य विभागाचे गोकुंदा येथे उपजिल्हा रुग्णालयात, मांडवी येथे ग्रामीण रुग्णालय तसेच फिरते आरोग्य पथके कार्यान्वित असतांना अनेक समस्येमुळे जनतेला आरोग्यसेवा विनाविलंब मिळणे कठीण झाले. शासकीय दवाखान्यात गोळ्या औषधांचा पुरवठाच नसल्याने कार्यरत डॉक्टर स्थानिक स्तरावर स्वखर्च करून भागवीत आहेत. वातावरणातील बदलामुळे सध्या विषाणूजन्य आजार व कीटकजन्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झाला. शासकीय असो की खासगी दवाखाने असो दररोज बाह्य रुग्णांचा आकडा दुपटीने वाढला. घरोघरी तीनचार जण ताप खोकला व इतर आजाराने फणफणू लागले आहेत़ विषमज्वराचेही प्रमाण वाढले. दवाखान्यात गर्दीच गर्दी झाली. जून महिन्यापासून गोळ्या औषधी पुरवठा नसल्याने कर्तव्यावर असणा-या डॉक्टरांना मात्र ही चांगलीच डोकेदुखी ठरली आहे़
गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात?
गोकुंदा येथे कार्यान्वित असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात गेल्या साडेतीन वर्षापासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नाही़ प्रभारी अधिक्षकावरच मागविले जात आहे़ येथे एमडी़मेडीशन (फिजिशियन), स्त्री रोग व प्रसुती तज्ञ, भूलतज्ञ पदे रिक्त आहेत़ स्त्री रोग व प्रसूती तज्ञ नसल्याने येथे बाळंतपणासाठी दाखल होणाºया गर्भवती महिलांना तेलंगणातील आदिलाबाद व इतर ठिकाणी रेफर करण्याची वेळ आली. गेल्या सहा महिन्यात १५६ गर्भवती महिलांना रेफर करण्यात आल्याची माहिती आहे़ सध्या गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी वाढली आहे़ एरव्ही अडीचशे ते तीनशे असणारी ओपीडी सातशे ते आठशेवर जाऊन पोहोचली आहे़ अंतररुग्णही वाढले आहेत़
१५६ गरोदर माता रेफर

  • स्त्री रोग तज्ञ व प्रसूती तज्ञा डॉ़पल्लेवार यांच्या सेवानिवृत्तीनंतर म्हणजे गेल्या सहा महिन्यांत १५६ गरोदर मातांना प्रसूतीसाठी रेफर करावे लागले़ जर तज्ञ डॉक्टर असते तर रेफरची वेळ आली नसती़ गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीसाठी कार्यान्वित असलेल्या ईसीजी हाथाळन्यायासाठी टेक्निशियन व फिजिशियन नाही़ व्हेंटिलेटर आहे पण आॅपरेटर नाही, ब्लड स्टोरेज आहे पण टेम्परेचर दाखवत नाही़
  • सोनोग्राफी मशीनही उपजिल्हा रुग्णालयाची नाही़ माहुरच्या सोनोग्राफीवरच मागविले जात आहे़ या रुग्णालयाची रूग्णवाहिका धर्माबादला असून ट्रामाच्या रुग्णवाहिकेवरच भागविले जात आहे़ त्यामुळे नाव सोनाबाई हाती कथलाचा वाळा अशी म्हणण्याची वेळ आली आहे़ गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात ईसीजी व इतर उपकरणे हाताळण्यासाठी टेक्निशियन नसल्याच्या वृत्ताला प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ़विकास जाधव यांनी दुजोरा दिला आहे़

Web Title: Feeling cold, cold, coughing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.