दसरा-दिवाळीनिमित्त फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन; काझीपेट-दादर व्हाया नांदेडच्या २६ फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 07:30 PM2024-10-07T19:30:50+5:302024-10-07T19:32:03+5:30
जनरल, स्लीपर आणि वातानुकूलित अशी १७ डब्यांची ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी राहील.
नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेने दसरा व दिवाळी सणाला प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता काझीपेट-दादर-काझीपेट ही फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवाच्या कालावधीत धावणाऱ्या या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनच्या २६ फेऱ्या होतील. जनरल, स्लीपर आणि वातानुकूलित अशी १७ डब्यांची ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी राहील.
गाडी क्रमांक (०७१९५) काझीपेट- दादर मार्गे करीमनगर, निझामाबाद, नांदेड, औरंगाबाद ही विशेष गाडी १६, २३ ऑक्टोबर आणि १३, २० आणि २७ नोव्हेंबर रोजी दर बुधवारी काझीपेट स्थानकावरून दुपारी ३.०० वाजता सुटेल. जम्मिकुंता, पेद्द्पल्ली, करीमनगर, लीगामपेट, जागीत्याल, कोराटला, मेत्पल्ली, अर्मूर, निझामाबाद, बासर, धर्माबाद, उमरी, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण मार्गे दादर स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ मिनिटाला पोहोचेल.
गाडी क्रमांक (०७१९६) दादर-काझीपेट मार्गे औरंगाबाद, नांदेड, निझामाबाद व करीमनगर या मार्गाने जाणारी ही विशेष गाडी १७ व २४ ऑक्टोबर व १४, २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी दादर येथून दर गुरुवारी दुपारी ३.२५ मिनिटाला सुटेल. आलेल्या मार्गानेच दुसऱ्या दिवशी काझीपेट येथे दुपारी ४.०० वाजता पोहोचेल.
व्हाया बल्लारशा
गाडी क्रमांक (०७१९७) काझीपेट-दादर ही स्पेशल ट्रेन बल्लारशा, पिंपळकुट्टी, आदिलाबाद, किनवट, नांदेड, औरंगाबाद मार्गे जाईल. ही ट्रेन १२, १९ व २६ ऑक्टोबर आणि २, ९, १६, २३ व ३० नोव्हेंबर रोजी दर शनिवारी काझीपेट येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल. जम्मिकुंता, पेद्द्पल्ली, मंचीर्याल, बेल्लाम्पल्ली, सिरपूर कागझनगर, बल्लारशा, चंद्रपूर, भांडक, वणी, कायेर, लीन्ग्ती, पिंपळकुट्टी, आदिलाबाद, किनवट, सहस्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण मार्गे दादर स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ मिनिटाला पोहोचेल. तर गाडी क्रमांक (०७१९८) दादर-काझीपेट ही गाडी १३, २० व २७ ऑक्टोबर तथा ३, १०, १७ व २४ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी २०२४ रोजी दादर येथून दर रविवारी दुपारी ३.२५ मिनिटाला सुटेल. आलेल्या मार्गानेच काझीपेट येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल.