ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने २६ ग्रामपंचायतींत चढला ज्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:36+5:302020-12-26T04:14:36+5:30

माहे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या किनवट तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आरक्षित ...

Fever rises in 26 gram panchayats due to gram panchayat elections | ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने २६ ग्रामपंचायतींत चढला ज्वर

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने २६ ग्रामपंचायतींत चढला ज्वर

Next

माहे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या किनवट तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेकांकडे जात प्रमाणपत्र नसल्याने ते मिळविण्यासाठी फाइल दाखल केलेल्या अनेकांची गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सायंकाळपर्यंत गर्दी दिसून आली.

आरक्षित जागा मोठ्या प्रमाणावर असल्याने पॅनल प्रमुख जात प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे. आरक्षित जागा असल्याने व बहुतांश ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे आरक्षित असणार असल्याने आपल्याला काय करायचे या भूमिकेत काही गावपुढारी आहेत. मात्र, सरपंचपद जरी मिळणार नसले तरी उपसरपंचपद मिळवून गावाचा कारभार पाहण्यासाठी काहींनी जोर दिला आहे.

तालुक्यातील इस्लापूर, शिवणी, कोसमेट या मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने येथे मोठी चुरस असणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्या दृष्टीने व्यूहरचना आखायला गावपुढाऱ्यांनी सुरुवात केली होती. मात्र, ते रद्द करून निवडणुकीनंतर सरपंचाचे आरक्षण होणार असल्याने गावपुढारी व निवडणूक लढवणारे संभ्रमात सापडले आहेत.

असे असले तरी पाच वर्षांत एकदा निवडणूक होत असल्याने व ग्रामपंचायत ही गावपातळीवर मिनी मंत्रालय असल्याने गावोगावी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला रंग चढू लागला आहे.

आंदबोरी (ई.), अप्पारावपेठ, इरेगाव, इस्लापूर, कंचली (ई.), करंजी (हुडी), कुपटी (बु.), कोसमेट, गोंडजेवली, गोंडेमहागाव, चिखली (ई.), दयाळधानोरा, दहेगाव (चि), पांगरपहाड, पांगरी, फुलेनगर, बोधडी (खु.), भिसी, मदनापूर (चि.), मलकवाडी, मलकापूर खेर्डा, मुळझरा, रामपूर, रिठा, लिंगी, शिवणी या सव्वीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.

Web Title: Fever rises in 26 gram panchayats due to gram panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.