नव्या मुख्य अभियंत्यांची परिमंडळासाठी फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:10+5:302021-06-28T04:14:10+5:30

राजेश निस्ताने नांदेड : सार्वजनिक बांधकाम खात्यात १२ अधीक्षक अभियंत्यांना पदाेन्नती देऊन मुख्य अभियंता बनविले जाणार आहे. यातील बहुतांश ...

Fielding for the circle of new Chief Engineers | नव्या मुख्य अभियंत्यांची परिमंडळासाठी फिल्डिंग

नव्या मुख्य अभियंत्यांची परिमंडळासाठी फिल्डिंग

Next

राजेश निस्ताने

नांदेड : सार्वजनिक बांधकाम खात्यात १२ अधीक्षक अभियंत्यांना पदाेन्नती देऊन मुख्य अभियंता बनविले जाणार आहे. यातील बहुतांश अभियंत्यांनी परिमंडळात (प्रादेशिक) नियुक्ती व्हावी यासाठी आतापासूनच आपल्या राजकीय गाॅडफादरमार्फत फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.

सद्य:स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागात पुणे व अमरावती येथील मुख्य अभियंता नियमांनुसार बदलीस पात्र ठरतात; परंतु त्यांनाही सचिव पदावरील बढतीचे वेध लागल्याने व सचिवाच्या महत्त्वाच्या दाेन जागा पुढील तीन महिन्यांत रिक्त हाेणार असल्याने त्यांनीही आहे त्याच ठिकाणी आणखी मुदतवाढ मिळविता येईल का, या दृष्टीने चाचपणी चालविली आहे. इतर प्रादेशिक परिमंडळातील मुख्य अभियंते बदलीस पात्र नाहीत, तरीही नव्या मुख्य अभियंत्यांनी त्यांची खुर्ची हलवून तेथे बस्तान मांडण्यासाठी ‘वजनदार’ प्रयत्न सुरू केले आहेत. कित्येकांनी त्यासाठी राजकीय मार्गाने माेर्चेबांधणीही आरंभिली. अमरावतीसाठी लगतच्या अकाेल्यातूनच प्रयत्न सुरू आहेत.

१६ अधीक्षक अभियंत्यांच्या पदाेन्नतीला ‘डीपीसी’ने मंजुरी दिली असली तरी मुख्य अभियंत्यांच्या १२ जागा रिक्त असल्याने तेवढ्याच अधीक्षक अभियंत्यांना बढती मिळणार आहे. नियमानुसार या १२ जणांमधून आधी मुख्य अभियंत्यांच्या रिक्त १२ जागा भरणे अपेक्षित आहे; परंतु त्यातील अनेक जागा ‘साईड ब्रँच’ म्हणून ओळखल्या जात असल्याने तेथील नियुक्तीस फारसे काेणीही ‘इंटरेस्टेड’ नाहीत. त्यामुळेच त्यांनी ‘प्रादेशिक’मधील नियुक्त्यांसाठी जाेर लावला आहे. त्यात कुणाला यश येते याकडे बांधकाम खात्याच्या नजरा लागल्या आहेत.

चाैकट

सचिवांच्या दाेनच जागा रिक्त

राज्यात बांधकाम सचिवांच्या दाेनच जागा रिक्त असून, त्या रस्ते विकास महामंडळातील आहेत. तेथील एका जागेचा अतिरिक्त प्रभार सचिव (बांधकामे) यांच्याकडे आहे. त्यामुळे दाेनच मुख्य अभियंत्यांना बढती दिली जाण्याची शक्यता आहे.

चाैकट

सचिवांच्या आणखी दाेन जागा रिक्त हाेणार

सार्वजनिक बांधकाम खात्यातील सचिव (रस्ते) व सचिव (बांधकामे) या दाेन जागा सेवानिवृत्तीमुळे अनुक्रमे सप्टेंबर व ऑक्टाेबर २०२१ मध्ये रिक्त हाेणार आहेत. या जागांवर पदाेन्नतीच्या यादीतील मुख्य अभियंत्यांचा डाेळा आहे.

चाैकट

सेवानिवृत्तीच्या ६० वर्षांचे भिजत घाेंगडे

‘आयएएस’च्या धर्तीवर सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियांत्रिकी सचिवांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० वर्षे करण्याची मागणी आहे; परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सचिवांच्या खुर्चीतील विद्यमान मंडळी मात्र हा निर्णय तातडीने व्हावा व आपल्याला आणखी दाेन वर्षांचा कालावधी मिळावा, यासाठी प्रयत्नरत आहेत.

Web Title: Fielding for the circle of new Chief Engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.