पंधरा दिवस झाले तरी खरेदी शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:20+5:302021-02-16T04:19:20+5:30
१हजार १७७ एसएमएस पाठवूनही एकाही शेतकऱ्याने तूर आणली नाही. त्यामुळे नाफेडची अद्यापही बोहनी झाली नाही. तूर हंगाम सुरू ...
१हजार १७७ एसएमएस पाठवूनही एकाही शेतकऱ्याने तूर आणली नाही. त्यामुळे नाफेडची अद्यापही बोहनी झाली नाही. तूर हंगाम सुरू होताच कृषी उत्पन्न बाजार समितीने नाफेडच्या तूर खरेदीसाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार १ हजार १७७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नाफेडचे हमी भाव ६ हजार रुपये प्रतिक्विंटल व खुल्या बाजारात तुरीला ६ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी चक्क पाठ फिरवली आहे. ११७७ शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने एसएमएस पाठवले; मात्र एकाही शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर तूर आणली नसल्याने नाफेडची बोहनीच झाली नाही.
सुरुवातीला खासगी व्यापाऱ्यांनी मायचर असल्याने ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला तरी शेतकऱ्यांना परवडेल आता आणखी दोनशे रुपये वाढून मिळत असल्याने नाफेडचे खरेदी केंद्र ओसच पडून आहे.
५०० शेतकऱ्यांनी केली नोंदणी
-
आता नाफेडची हरभरा नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चालवली आहे. आज १५ फेब्रुवारी रोजी पहिल्याच दिवशी पाचशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवि तिरमनवार यांनी दिली. नाफेडचा हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असल्याने व खुल्या बाजारात ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव असल्याने हरभरा उत्पादक शेतकरी आपला हरभरा नाफेडलाच विक्री करतील असे चित्र आहे.