कबीरवाडी येथे हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:30+5:302021-01-21T04:17:30+5:30

२२ हजार रुपये कपात भोकर - शहरातील बँक ऑफ बडोदामध्ये असलेल्या बचत खात्यातून एका युवकाचे २२ हजार रुपये लांबविल्याची ...

Fighting at Kabirwadi | कबीरवाडी येथे हाणामारी

कबीरवाडी येथे हाणामारी

Next

२२ हजार रुपये कपात

भोकर - शहरातील बँक ऑफ बडोदामध्ये असलेल्या बचत खात्यातून एका युवकाचे २२ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली. १० दिवस उलटूनही कपात कोणी केली, कोणाच्या खात्यावर वर्ग झाले याबाबतची माहिती बँकेने खातेदार साईनाथ सोलादवारकर यास दिली नाही. बँकेने चौकशी करून रक्कम मिळवून देण्याची मागणी त्याने केली आहे.

जनसेवा पॅनलचा झेंडा

बिलोली - आदमपूर, ता.बिलोली ग्रा.पं. निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनलने ११ जागांवर विजय मिळविला. विजयी उमेदवारांत बजरंग राहिरे, लक्ष्मण माधव कोकणे, शंकर मालीपाटील, चंद्रकांत देवारे आदींचा समावेश आहे. पॅनलच्या विजयासाठी हणमंतराव माली पाटील, हणमंतराव पाटील, शिवदास हलबुर्गे, बालाजी बिद्राळे, सुधाकर घंटापल्ले, अनिल पाटील आदींनी परिश्रम घेतले.

काँग्रेसला बहुमत

कंधार - कंधार तालुक्यातील उस्माननगर ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीने आठ जागा मिळविल्या, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एकता पॅनलला सहा जागा मिळाल्या. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.

सुजलेगावकर यांची निवड

नायगाव - मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल क्रीडारत्न पुरस्कारासाठी सुभाष सुजलेगावकर यांची निवड झाली. कला, क्रीडा, साहित्य आदी क्षेत्रांतील व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

मंदिर परिसरात वृक्षारोपण

लोहा - शहरातील योगिराज निवृत्ती महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी पंं.स. सदस्य नवनाथ चव्हाण, नगरसेवक पंंचशील कांबळे, संजय राठोड, माधवराव डोईफोडे, धनराज गुमनर, सुनील पवार, नितीन माने, परमेश्वर वाघमारे, भगवानराव हाके, लक्ष्मणराव फाळके, शिवानंद आचमारे, मन्मथ स्वामी, शंकर अडकुने आदी उपस्थित होते.

३१ रोजी मिळणार डोस

किनवट - किनवट तालुक्यातील लहान बालकांना रविवारी ३१ जानेवारी रोजी पोलिओ डोस दिला जाणार आहे. शनिवार १६ पासून कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाल्यामुळे पोलिओ लसीकरणाची मोहीम पुढे ढकलण्यात आली असावी अशी चर्चा आहे.

रुग्णालयाचा आढावा

कंधार - भाजप महिला मोर्चाच्या वतीने कंधार येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन विविध सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष जयमंगल औरतकर, सुनंदा वंजे, कल्पना गिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद फिसके आदी उपस्थित होते.

चाभरा काँग्रेसकडे

हदगाव - तालुक्यातील चाभरा ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात गेली. या निवडणुकीत भंडारे यांच्या गटाचे सहा उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांत कल्पना चाभरेकर, रमेश भंडारे, नारायणअप्पा संगेवार, अमोल बोले, शकुंतला पावडे, बेबी पवार यांचा समावेश आहे.

सावरगाव काँग्रेसच्या ताब्यात

उमरी - उमरी तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. पॅनल प्रमुख गंगाधर पाटील यांच्या पॅनलचे सातपैकी चार उमेदवार निवडून आले. विरोधी गटाचे तिघे निवडून आले. सदस्यांना निवडून आणण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Fighting at Kabirwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.