दोन गटांत हाणामारी, तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:39 AM2019-04-20T00:39:19+5:302019-04-20T00:41:01+5:30

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या एका कार्यकर्त्यांने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांच्या परिवारावर खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्यावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाले. यातील एका गंभीर जखमीला प्रथम यवतमाळ व नंतर सावंगी मेघे येथील मेघे हॉस्पिटल मध्ये अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

fighting in two groups, tense in mahur | दोन गटांत हाणामारी, तणावपूर्ण शांतता

दोन गटांत हाणामारी, तणावपूर्ण शांतता

Next
ठळक मुद्देमाहुरात तिघे जखमी टोळक्यांनी केली लूटमार

माहूर : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या एका कार्यकर्त्यांने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांच्या परिवारावर खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्यावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाले. यातील एका गंभीर जखमीला प्रथम यवतमाळ व नंतर सावंगी मेघे येथील मेघे हॉस्पिटल मध्ये अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
१९ एप्रिल रोजी माहूर शहरात सकाळी ११ वाजेच्या सुमारास वॉर्ड क्रमांक १३ मधील मारुती मंदिराजवळ हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर दुपारी एक ते दोनच्या दरम्यान शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन जोगाराम राठोड (नाईक), सोनू ऊर्फ आशिष चारभाई, पवन शर्मा, शक्ती ठाकूर, अविनाश मोहन राठोड, अक्षय परस्कर, संदीप हुसे व इतर २० ते २५ लोकांच्या जमावाने कुठलेच कारण नसताना नगराध्यक्षाचे बंधू सरफराज दोसानी यांच्या मालकीचे न्यू माहेर कलेक्शन या कापड दुकानात हातात घण (दगड फोडण्याचा हातोडा) लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉड घेऊन दुकानात घुसून दुकानातील माल लुटण्याचा प्रयत्न केला व दहशत निर्माण केली. शुक्रवार दिवसभराच्या व्यवसायाची रोख रक्कम व १७ व १८ रोजी बँक बंद असल्याने दोन दिवसांची व्यवसायाची रक्कम असे एकूण दोन ते अडीच लक्ष रुपये गल्ल्यातून काढून घेतल्याचा आरोप आहे.
सेनेच्या जमावाने दहशत पसरवत शहरातील व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करण्यास भाग पाडले. या घटनेची दखल घेत कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी काही पोलीस कर्मचारी निवडणूक बंदोबस्तात दुसरीकडे गेलेले असताना सिंदखेड व महागाव पोलिसांना पाचारण करून सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला. शहरात तूर्तास शांतता अबाधित राहिली असली तरी माहूर शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. दरम्यान, तालुक्यातील व शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार पवार, माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल हे माहूर येथे ठाण मांडून बसले आहेत.
वादाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाई बाजार येथे झालेल्या शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारसभेत जि.प.चे उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर जाहीर भाषणात अर्वाच्च भाषेत कौटुंबिक टिपण्णी केल्यानेच राग अनावर होऊन हा प्रकार घडल्याची चर्चा होती.

  • जखमीवर माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. विजय मोरे, डॉ.निरंजन केशवे यांनी प्रथमोपचार करून यवतमाळकडे रेफर केले. या हाणामारीत एमआयएम नगरसेविकेचा मुलगा शे.सज्जाद शे. अजीज हा गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून सावंगी मेघे येथे हलविण्यात आले.

Web Title: fighting in two groups, tense in mahur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.