धर्माबादच्या उपनगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:21 AM2019-05-31T00:21:31+5:302019-05-31T00:22:21+5:30

येथील उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या कारभाराला कंटाळून १२ नगरसेवकांनी अविश्वास ठरावाचे पत्र गुरुवारी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे दिले़ राजकीय क्षेत्रात या प्रस्तावामुळे खळबळ उडाली़ यावर काय निर्णय होतो, याकडे धर्माबादवासियांचे लक्ष लागले आहे़

File a no confidence motion against the sub-city head of Dharmabad | धर्माबादच्या उपनगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

धर्माबादच्या उपनगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वपक्षीय ठराव : उपनगराध्यक्षाच्या कारभाराला कंटाळलेल्या १२ नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र

धर्माबाद : येथील उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या कारभाराला कंटाळून १२ नगरसेवकांनी अविश्वास ठरावाचे पत्र गुरुवारी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे दिले़ राजकीय क्षेत्रात या प्रस्तावामुळे खळबळ उडाली़ यावर काय निर्णय होतो, याकडे धर्माबादवासियांचे लक्ष लागले आहे़
अविश्वास ठरावावर काँग्रेसचे नीलेश पाटील बाळापूरकर, साधना सुरकूटवार, राष्ट्रवादीचे भोजराज गोणारकर, सुनीता जाधव, अहमदी बेगम, नजीमबेगम, भाजपाचे संजय पवार, साय्यारेड्डी गंगाधरोड, कविता बोल्लमवार, रूपाली अशोक पाटील बाळापूरकर, युनूस खान, महादाबाई वाघमारे यांच्या स्वाक्षºया आहेत.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष मनमानी करीत असल्याचा आरोप करून १२ नगरसेवक एकत्र आले व त्यांनी उपनगराध्यक्षाविरूद्ध अविश्वास ठराव दाखल केला़
धर्माबादच्या विकासासाठी मिळणाºया निधीच्या कारणावरून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक असे गट पालिकेत तयार झाले़
१२ नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीचे ४, भाजपाचे ४, काँग्रेस २, अपक्ष दोघांचा समावेश आहे़
काही दिवसापूर्वी झालेले पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर या १२ नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता़ नंतर तब्येतीच्या कारणावरून नगराध्यक्षा श्रीमती अफजल बेगम अब्दुल सत्तार यांनी सर्वसाधारण सभा रद्द केली होती़ यावेळी या १२ नगरसेवकांनी सभागृहाच्या बाहेर सभा घेतली़
मधल्या काळात लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने काहीही हालचाली झाल्या नाहीत़ निवडणुकीचा निकाल लागताच पुन्हा या १२ नगरसेवकांनी उचल खाल्ली आणि त्यांनी उपनगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास ठराव दाखल केला़ यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी केला खरा, मात्र त्यांनाही या नगरसेवकांनी जुमानले नाही़
पक्ष आता त्यांच्याविरूद्ध काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
धर्माबाद पालिकेच्या निवडणुका १८ डिसेंबर २०१६ रोजी झाल्या होत्या़ यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, काँग्रेसचे २, भाजपाचे ४ व तीन अपक्ष निवडून आले होते़
नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाली़ यात काँग्रेसच्या अफजल बेगम अब्दुल सत्तार निवडून आल्या होत्या़

उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला़ ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येईल़ अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बैठक घ्यावी लागते़ जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशान्वये पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल                               -गंगाधर पेंटे, प्रभारी मुख्याधिकारी, धर्माबाद पालिका़
शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस व माजी आ़ बापूसाहेब देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नगरसेवकांना निवडून दिले होते़ त्यातील चौघांना विकासकामांचे काही देणेघेणे नाही़ फक्त त्यांना कोणत्याही कामात दक्षिणा कशी मिळेल यात स्वारस्य आहे़ माझ्याविरूद्धचा अविश्वास ठराव का दाखल करण्यात आला याचे कारण जनतेला माहीत आहे़ ठराव बारगळणारच़ पक्षविरोधी कारवाई करणा-या नगरसेवकांना पक्ष व जनता धडा शिकवेन                                                                 - विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष, धर्माबाद पालिका़

Web Title: File a no confidence motion against the sub-city head of Dharmabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.