कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:36 AM2018-05-07T00:36:56+5:302018-05-07T00:36:56+5:30

शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ आणि ५ मे रोजी शहरात पाणी दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला़

Filing water of Limboth in Kandahar city | कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल

कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल

Next
ठळक मुद्देअडथळ्याच्या शर्यतीवर मात : शहरवासियांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ आणि ५ मे रोजी शहरात पाणी दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला़
शहराला सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुजल निर्मल अभियानांतर्गत २५ कोटी ६७ लाख ७२ हजारांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ साडेतीन वर्षे संपत आले; पण योजना कार्यान्वित होवू शकली नाही़ एक्स्प्रेस फिडरचे काम प्रगतीपथावर असल्याचे सातत्याने सांगितले जाते़ ते पूर्ण कधी होणार? हा खरा प्रश्न आहे़ लिंबोटी येथील पाणीपुरवठा योजनेचे पूर्ण काम होऊनच शहराची खरी तहान भागणार आहे़ अन्यथा तात्पुरती व पर्यायी व्यवस्था कधी कोलमडेल, याचा भरवसा नाही़
शहरात जवळपास १० दिवस पाण्याचा ठणठणाट झाल्यानंतर ऩप़ने लिंबोटी येथील पाणी आणण्याची कसरत सुरू केली़ विद्युत पुरवठा नसल्याने जनरेटरचा वापर केला़ आणि २० एच़पी़च्या मोटारीने पाणी आणण्याचा प्रयत्न केला़ जलवाहिनीत पाणी येत असताना मध्येच जलवाहिनी फुटली़ त्याची दुरुस्ती करण्यात आली़ पुन्हा जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला़ त्यामुळे प्रयत्नाला खीळ बसली़ त्यानंतर मोठ्या क्षमतेच्या जनरेटरचा वापर करून प्रयत्न सुरू झाले़ आणखी अडथळा आला़ त्यावर मात करून अखेर ५ मे रोजी रात्री शहरात पाणी दाखल झाले़ आणि ६ मे रोजी काही भागात पाणीपुरवठा करण्यात आला़ ‘लोकमत’ने शहर पाणी पुरवठ्याचा प्रश्न लावून धरला होता़ नगराध्यक्षा शोभा नळगे, मुख्याधिकारी सवाखंडे, पाणीपुरवठा विभागाचे लुंगारे, एजाज, नगरसेवक शहाजी नळगे आदींनी मोठी अडथळ्यांची शर्यत पार करीत पाणी आणले़ परंतु, ९० एच़पी़ च्या मोटारीने पाणी शहरात आले तरच पाणी संकट पूर्णत: टळणार आहे़ अन्यथा नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़
दरम्यान, पाणी जपून वापरण्याची गरज आहे़ त्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे़

शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ऩप़ने कोणतीही कसर ठेवली नाही़ अनेक तांत्रिक अडचणी आल्या़ त्यावर मात करत पाणी शहरात आणले़ आता ९ एच़पी़च्या मोटारीने जनरेटरचा वापर करत पाणी दोन दिवसांत शहरात आणले जाईल़ विद्युतची कामे करण्यावर भर राहील व पाणीसमस्या दूर होईल -शोभा अरविंद नळगे, नगराध्यक्षा, कंधाऱ

Web Title: Filing water of Limboth in Kandahar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.