अखेर बीडीएस प्रणाली झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:36+5:302021-05-10T04:17:36+5:30
एप्रिल महिन्यापासून बीडीएस प्रणाली बंद असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीतील रक्कम मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे ...
एप्रिल महिन्यापासून बीडीएस प्रणाली बंद असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीतील रक्कम मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बीडीएस प्रणाली सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. याची दखल घेत शासनाने बीडीएस प्रणाली सुरू केली असल्याची माहिती राज्य संयुक्त संघटक चंद्रकांत मेकाले यांनी दिली.
यावेळी सरचिटणीस कल्याण लवांडे, प्रकाश दळवी, किरण पाटील, दिलीप देवकांबळे, अशोक पाटील, प्रल्हाद राठोड, सुधाकर थडके, उमाकांत मैलारे, आदींची उपस्थिती होती.
चौकट
२२ कोटींची देयके मंजुरीसाठी कोषागारकडे
बीडीएस प्रणाली सुरू हाेताच नांदेड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील भविष्यनिर्वाह निधी व इतर तत्सम २२ कोटींची देयके मंजुरीसाठी कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत.
पुढील आठवड्यात संबंधितांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती लेखाविभागातील सुत्रांनी दिली. दरम्यान, सरकारने ही प्रणाली सुरू केल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.