अखेर दुसरा डोस देण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:18 AM2021-05-12T04:18:22+5:302021-05-12T04:18:22+5:30
११ मे पर्यंत जिल्ह्याला कोविशिल्ड ३ लाख २३ हजार ७३० व कोव्हॅक्सिन ९६ हजार ४४० एवढा डोसेसचा साठा प्राप्त ...
११ मे पर्यंत जिल्ह्याला कोविशिल्ड ३ लाख २३ हजार ७३० व कोव्हॅक्सिन ९६ हजार ४४० एवढा डोसेसचा साठा प्राप्त झाला असे एकूण ४ लाख २० हजार १७० एवढे डोसेस आहेत. १० मे अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण ३ लाख ७२ हजार ५०२ लाभार्थ्यांचे आरोग्य विभागाने लसीकरण यशस्वी करून दाखविले आहे.
लसीकरणासाठी चार गट तयार करण्यात आले आहेत. यात हेल्थ केअर वर्कर गटातील १९ हजार १४७ व्यक्तींना पहिला डोस, तर ९ हजार ८२६ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे यांची एकूण संख्या २८ हजार ९७३ एवढी होते. फ्रंटलाईन वर्कर गटातील ३० हजार ११० व्यक्तींना पहिला डोस, तर ९ हजार १८३ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. यांची एकूण संख्या ३९ हजार २९३ एवढी होते. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील २१ हजार ६५८ व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला आहे. ४५ वर्षांवरील गटातील २ लाख ५१ हजार ४०२ व्यक्तींना पहिला डोस, तर ३१ हजार १७६ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. याची एकूण संख्या २ लाख ८२ हजार ५७८ एवढी होते. या चारही गटाची एकूण संख्या ३ लाख ७२ हजार ५०२ एवढी आहे. जिल्ह्यातील उर्वरित लोकांचे लसीकरण अधिक सुरळीत व्हावे यासाठी आरोग्य विभागाचे नियोजन केले आहे.
मनपा हद्दीत जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना, हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा अशा एकूण ६ केंद्रांवर कोविशिल्ड लस १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील लाभार्थी यांच्यासाठी उपलब्ध आहे. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णाल, ग्रामीण रुग्णालय असे एकूण १६ ठिकाणी कोव्हॅक्सिन ४५ वर्षांवरील लाभार्थी (दुसरा डोस) साठी उपलब्ध आहे. ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ६७ ठिकाणी कोविशिल्ड लस ४५ वर्षांवरील लाभार्थी यांच्यासाठी उपलब्ध आहे.