रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आर्थिक लूट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:14+5:302021-04-17T04:17:14+5:30

चौकट.......... प्रशासनाचा ढिम्म कारभार मागील १५ ते २० दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याचा विषय ज्वलंत आहे. शेकडो रुग्णांचे नातेवाईक या ...

Financial loot for remedivir injection continues | रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आर्थिक लूट सुरूच

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आर्थिक लूट सुरूच

googlenewsNext

चौकट..........

प्रशासनाचा ढिम्म कारभार

मागील १५ ते २० दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याचा विषय ज्वलंत आहे. शेकडो रुग्णांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी भटकताना दिसतात. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे इंजेक्शनची उपलब्धता किती आहे, दररोजची मागणी काय आहे. याबाबतची माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.

लसीकरणाच्या आकडेवारीतही लपवाछपवी...

जिल्ह्यात सध्या लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र, ही मोहीमही जिल्हा परिषद आरोग्य विभाग गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी लसीकरणाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार दूरध्वनी केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही, तर इतर अधिकाऱ्यांनीही याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केली. शेजारच्या जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी दररोज दिली जात आहे. किती आणि कोणत्या केंद्रावर लस उपलब्ध आहे हेही सांगितले जात आहे. मात्र, आरोग्य विभाग माहिती लपवित असल्याने नागरिकांना केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत.

Web Title: Financial loot for remedivir injection continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.